Govinda : बायकोच्या बडबडीला कंटाळला गोविंदा! मराठी अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलला, सगळं सांगून टाकलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Govinda on Extra Marital Affair Rumours : अभिनेता गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चा गेली अनेक महिने सुरू आहेत. त्याची बायको सुनिता देखील अनेकदा याविषयी बोलली आहे. तिने गोविंदावर अनेक आरोपही केले. अखेर गोविंदाने या सगळ्यावर मौन सोडलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गोविंदा पुढे म्हणाला, "माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं की माझ्याविरोधात अनेक वर्षांपासून कट रचला जात आहे. मी 15 वर्षांहून अधिक काळ शांत राहिलो. मला वाटायचं हे सगळं माझ्या नशिबामुळे होत आहे. मी प्रार्थना आणि अध्यात्मावर विश्वास ठेवतो. पण जेव्हा या गोष्टी कायम सुरू राहतात, तेव्हा कुणीतरी मुद्दाम हे करत आहे, असं वाटू लागतं."
advertisement
advertisement
सुनिता आणि तिच्या मागील काही वादग्रस्त वक्तव्यांविषयी बोलताना गोविंदा म्हणाला, "सुनीता सुशिक्षित आहे. ती कधीही अश्लील भाषा वापरत नाही. पण गेल्या काही दिवसांत जे काही पाहतो आहे ते निराशाजनक आहे. मी शांत राहतो म्हणून लोकांना वाटतं की मी कमकुवत आहे किंवा खरंच निर्दयी आहे. म्हणूनच आता मी बोलतो आहे".









