जानेवारी सुखात जाणार, पण फेब्रुवारीचा शेवट 'या' 3 राशींच्या लोकांची झोप उडवणार; राहावं लागणार अलर्ट!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल मानवी जीवनावर खोलवर परिणाम करतात. येत्या फेब्रुवारी 2026 च्या शेवटच्या आठवड्यात आकाशात एक अत्यंत स्फोटक आणि अशुभ मानला जाणारा 'अंगारक योग' तयार होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
सिंह: अचानक संकटांची शक्यता सिंह राशीच्या जातकांसाठी हा योग त्यांच्या कुंडलीतील आठव्या भावात तयार होत आहे. या काळात तुम्हाला आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात. वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगा, कारण अपघाताचे योग आहेत. विनाकारण कोणाशीही वाद घालू नका, अन्यथा तुमची सामाजिक प्रतिष्ठा मलीन होऊ शकते. अचानक मोठे खर्च समोर येतील.
advertisement
कन्या: शत्रुत्व आणि आरोग्याचे प्रश्न कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग सहाव्या भावात बनत आहे. तुमचे गुप्त शत्रू सक्रिय होतील आणि तुमच्या विरोधात कारस्थान रचू शकतात. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळणे कठीण जाईल. रक्ताशी संबंधित विकार किंवा पोटाचे आजार त्रस्त करू शकतात. नोकरीत कामाचा ताण वाढेल आणि सहकाऱ्यांशी मतभेद होतील.
advertisement
मीन: मानसिक तणाव आणि आर्थिक नुकसान मीन राशीच्या जातकांसाठी हा योग त्यांच्या बाराव्या भावात तयार होत आहे. या काळात तुमचे नशिब अचानक साथ सोडल्यासारखे वाटेल. आर्थिक गुंतवणुकीत मोठी जोखीम पत्करू नका, अन्यथा पैसे बुडू शकतात. मानसिक अस्वस्थता आणि झोपेच्या तक्रारी वाढतील. जोडीदारासोबत विनाकारण खटके उडतील, ज्यामुळे घरातील शांतता भंग होऊ शकते.
advertisement










