गुप्त नवरात्रीला सुरुवात! आजच करा 'हे' 5 सोपे उपाय, लग्न, करिअर, पैसा, सगळ्याच अडचणी होतील झटक्यात दूर

Last Updated:

आजपासून 'माघ गुप्त नवरात्री' प्रारंभ होत आहे. सामान्य नवरात्रीमध्ये आपण देवीची सार्वजनिक पूजा करतो, मात्र गुप्त नवरात्रीमध्ये 'शक्ती'ची साधना अत्यंत गोपनीय पद्धतीने केली जाते.

News18
News18
Gupt Navratri 2026 : आजपासून 'माघ गुप्त नवरात्री' प्रारंभ होत आहे. सामान्य नवरात्रीमध्ये आपण देवीची सार्वजनिक पूजा करतो, मात्र गुप्त नवरात्रीमध्ये 'शक्ती'ची साधना अत्यंत गोपनीय पद्धतीने केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, गुप्त नवरात्रीमध्ये केलेल्या उपायांचे फळ इतर दिवसांच्या तुलनेत कैक पटीने जास्त मिळते. जर तुमच्या लग्नात अडथळे येत असतील, करिअरमध्ये प्रगती थांबली असेल किंवा पैशांची चणचण भासत असेल, तर पुढील 9 दिवसांत हे विशेष उपाय नक्की करा.
लग्नातील अडथळ्यांसाठी हळदीचा उपाय
ज्या तरुण-तरुणींच्या विवाहाचे योग जुळून येत नाहीत किंवा लग्नाचे बोलणे होऊनही तुटते, त्यांनी गुप्त नवरात्रीत हा उपाय करावा. नवरात्रीच्या नऊ दिवसांत रोज माता पार्वतीला 9 किंवा 11 हळकुंडे अर्पण करा. विवाहातील अडथळे दूर होऊन लवकरच शुभ वार्ता मिळेल, अशी धार्मिक मान्यता आहे.
करिअरमध्ये प्रगतीसाठी हा उपाय करा
नोकरीत पदोन्नती मिळत नसेल किंवा व्यवसायात सतत नुकसान होत असेल, तर हा उपाय प्रभावी ठरतो. नवरात्रीच्या रात्री देवी दुर्गेसमोर तुपाचा दिवा लावा त्यानंतर 'ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे' या मंत्राचा जप करा. यामुळे करिअरमधील अडथळे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.
advertisement
आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी 'पान आणि श्रीं'चा उपाय
जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल किंवा कर्जाचा डोंगर वाढला असेल, तर हा गुप्त उपाय करा. अष्टमीच्या दिवशी एका स्वच्छ पानाच्या पानावर केशरने 'श्रीं' लिहा. हे पान देवीच्या चरणी अर्पण करा आणि काही काळानंतर ते आपल्या तिजोरीत ठेवा. यामुळे धनाचे आगमन वाढते.
नकारात्मक ऊर्जा आणि संकटांपासून मुक्ती
घरात सतत कटकटी किंवा कोणीतरी आजारी राहत असेल, तर हा उपाय लाभदायक आहे. नवरात्रीत दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि 11 परिक्रमा करा. परिक्रमा करताना 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' मंत्राचा जप करा. यामुळे पितृदोष आणि ग्रहदोष शांत होतात.
advertisement
शत्रुविजय आणि यशासाठी 'बगलामुखी' साधना
जर तुमच्या कामात शत्रू अडथळे आणत असतील किंवा कायदेशीर प्रकरणांत अडकला असाल, तर हा उपाय करा. पिवळे वस्त्र परिधान करून माता बगलामुखी किंवा माता कमला यांची पूजा करा. त्यांना पिवळी फुले अर्पण करा. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि सर्व क्षेत्रात यश मिळते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
गुप्त नवरात्रीला सुरुवात! आजच करा 'हे' 5 सोपे उपाय, लग्न, करिअर, पैसा, सगळ्याच अडचणी होतील झटक्यात दूर
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement