Prithvi Shaw News : टीम इंडियाचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपली आहे.तो सध्या टीम इंडियात वापसीसाठी असंख्य मेहनत घेत आहे.या दरम्यान गणेशोत्सवानिमित्त त्याने गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आहे. विशेष म्हणजे पृथ्वी शॉसोबत त्याची रूमर्ड गर्लफ्रेंड देखील बाप्पांचे दर्शन घेतले आहे.या संदर्भातले फोटो पृथ्वी शॉने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.त्यामुळे या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
advertisement
पृथ्वी शॉने रुमर्ड गर्लफ्रेंड आकृती अग्रवालसोबत फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्याने चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंवरून दोघांमध्ये काही खास नाते असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.अद्यापपर्यंत यावर कोणाकडूनही अधिकृत विधान आलेले नाही. पण शॉने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो त्याच्या कथित प्रेयसीसोबत दिसत आहे आणि त्याने लिहिले आहे की सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.
कोण आहे रुमर्ड गर्लफ्रेंड ?
आकृती अग्रवाल ही एक अभिनेत्री आहे आणि ती त्रिमुखा या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. पृथ्वी शॉने यापूर्वी आकृतीसोबत तिच्या वाढदिवशी फोटो शेअर केले होते आणि त्यानंतर दोघांमधील डेटिंगच्या अफवा वाढल्या. यापूर्वी पृथ्वी शॉ निधी तपाडीयाला डेट करत असल्याचे वृत्त होते, परंतु आता दोघांमधील नाते कदाचित तुटले आहे.
आकृती अग्रवालचा जन्म लखनऊमध्ये झाला होता आणि ती निर्मला मेमोरियल कॉलेजमधून बीएमएस करण्यासाठी मुंबईत आली होती. ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप प्रसिद्ध आहे आणि तिचे इंस्टाग्रामवर 3.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत तर युट्यूबवर तिचे सबस्क्राइबर्सची संख्याही खूप जास्त आहे.
पृथ्वी शॉची दमदार वापसी
पृथ्वी शॉने नुकताच मुंबईकडून महाराष्ट्र संघात दाखल झाला आहे. हा संघ बदलल्यापासून त्याचं नशीब बदललं आहे. कारण चेन्नईत सूरू असलेल्या बूची बाबू स्पर्धेत पृथ्वी शॉने छत्तीसगड विरूद्ध पहिल्या डावात जबरदस्त शतक ठोकले. यावेळी त्याने 122 बॉलमध्ये 111 धावा केल्या आहेत.या दरम्यान 15 चौकार आणि 1 षटकार लगावला होता.त्यानंतर दुसऱ्या डावात तो 1 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर TNCA प्रेसिडेंट्स XI विरूद्धच्या सामन्यात पृथ्वीने दुसऱ्या डावात 96 बॉलमध्ये 66 धावा केल्या आहेत.