पृथ्वी शॉची डबल सेंच्युरी
चंदीगडविरुद्धच्या सामन्यापूर्वी, पृथ्वी शॉ केरळविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या डावातही अपयशी ठरला होता. पहिल्या डावात तो आपलं खातंही उघडू शकला नाही, परंतु दुसऱ्या डावात त्याची बॅट कामी आल्याचं पहायला मिळालं आहे. केरळविरुद्धच्या दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने 75 धावा केल्या, परंतु चंदीगडविरुद्ध त्यानं डबल सेंच्युरी पूर्ण केली आहे. पृथ्वी शॉने आक्रमक खेळी करत डबल सेंच्युरी पूर्ण केली. पृथ्वीने 222 धावा करताना 29 फोर आणि पाच सिक्स मारले.
advertisement
महाराष्ट्राने 313 रन्सचा स्कोर उभा केला
चंडीगढविरुद्धच्या मॅचमध्ये महाराष्ट्र टीमने आपली पकड अधिक मजबूत केली आहे. टॉस हारल्यानंतर महाराष्ट्राला प्रथम बॅटिंगचे निमंत्रण मिळालं होतं. पहिल्या इनिंग्जमध्ये ऋतुराज गायकवाडच्या सेंच्युरीनंतर अर्शिन कुलकर्णी आणि सौरभ नवाले यांच्या शतकांच्या बळावर महाराष्ट्राने 313 रन्सचा स्कोर उभा केला होता. याला उत्तर देताना चंदीगड टीम 209 रन्सवर ऑल आऊट झाली.
टीमची लीड 400 रन्सच्या पार
दरम्यान, महाराष्ट्राला पहिल्या इनिंग्जमध्ये 104 रन्सची भक्कम लीड मिळाली. आता दुसऱ्या इनिंग्जमध्ये पृथ्वी शॉच्या डबल शतकाच्या जोरावर टीमची लीड 400 रन्सच्या पार गेली आहे. महाराष्ट्रने दुसरा डाव 313 धावा केल्या अन् चंदीगडसमोर 478 धावांची लीड घेतली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचं पारडं जड झालेलं दिसतंय.
