Rahul Dravid on Rohit Sharma : टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याने टी20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.त्यामुळे तो आता फक्त एकाच म्हणजे वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. या फॉरमॅटचे कर्णधारपदही त्याच्या जवळ आहे. पण सध्या रोहितला वनडे क्रिकेटमधून निवृत्त घ्यायला भाग पाडलं जाईल,अशी वृत्त समोर येत आहेत. आणि वनडेसाठी रोहितचा पुढचा वारसदार ठरवण्याच्या चर्चा सूरू आहेत.या चर्चे दरम्यान भारताच्या दिग्गजाने रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर मोठं विधान केलं आहे.त्यामुळे आता रोहित शर्मा 2027 वनडे वर्ल्ड कपपर्यंत कायम राहणार अशी चर्चा सूरू झाली आहे.
advertisement
खरं तर हा दिग्गज खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून भारताची माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. राहुल द्रविड यांनी रोहित शर्मासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.राहुल द्रविडने आर अश्विनच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले,'हे खरोखरच खूप छान होते. सर्वप्रथम, मला नेहमीच रोहितबद्दल असे वाटायचे की तो संघाची खूप काळजी घेतो. पहिल्या दिवसापासूनच तो संघ कसा चालवायचा आणि त्याच्यासाठी काय महत्त्वाचे आहे याबद्दल तो अगदी स्पष्ट होता. कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातील कोणत्याही नात्यात, विशेषतः मी ज्या पद्धतीने प्रशिक्षण देतो त्यामध्ये हे खूप महत्वाचे आहे.
राहुल द्रविडचा असा विश्वास आहे की संघ कर्णधाराचा असतो आणि तो त्याच्या पद्धतीने चालवला पाहिजे. तो म्हणाला, मी नेहमीच असा विश्वास ठेवला आहे की संघ कर्णधाराचा असावा. मी एक खेळाडू आहे आणि कर्णधार देखील आहे पण कर्णधाराला तो ज्या दिशेने जायचा आहे त्या दिशेने नेतृत्व करावे लागते. तुम्ही त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि यात त्याला मदत केली पाहिजे.
रोहितने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2021 मध्ये तो नियमित कर्णधार बनला. द्रविडचा असा विश्वास आहे की रोहितला त्याच्या अनुभवाचा खूप फायदा झाला. तुम्हाला कर्णधाराला महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यास मदत करावी लागेल. पण रोहितच्या बाबतीत, मला असे वाटले की तो संघाकडून काय हवे आहे, त्याला कोणत्या प्रकारचे वातावरण हवे आहे, त्याला कोणत्या प्रकारचे वातावरण हवे आहे, तो गोष्टी कशा चालवू इच्छितो याबद्दल तो अगदी स्पष्ट होता. त्याच्याकडे वर्षानुवर्षे अनुभव होता आणि त्यामुळे मदत झाली,असे राहुल द्रविड सांगतो.
दरम्यान राहुल द्रविडने रोहित शर्माच्या कर्णधार पदाबाबत जी बाजू सांगतली आहे ती एकता नक्कीच वनडेच्या कर्णधारपदावर तो कायम राहील असे वाटते आहे. सिलेक्टर्स देखील या गोष्टीचा गांभीर्याने विचार करतील.
द्रविड रोहितचा कारनामा
2021च्या अखेरीस राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला. त्यावेळी रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी20 संघाचे कर्णधारपदही मिळाले. काही महिन्यांनंतर रोहित कसोटी संघाचाही कर्णधार बनला. राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांच्या जोडीने 2024 मध्ये 11 वर्षांनी भारताला आयसीसी ट्रॉफी मिळवून दिली. भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून टी20 विश्वचषक जिंकला. विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपला.