21 वर्षाच्या मनीष विराटचा फोन
मडगाव गावातील रहिवासी 21 वर्षीय मनीषला खेळाडूंकडून फोन येऊ लागले तेव्हा ही घटना उघडकीस आली. जवळजवळ सहा महिन्यांपासून निष्क्रिय असलेला हा नंबर नियमित प्रक्रियेत मनीषला पुन्हा देण्यात आला, असे गरियाबंदचे एसपी निखिल राखेचा यांनी सांगितलं. 21 वर्षाच्या मनीषने तब्बल 15 दिवस फोन येणाऱ्यांची शाळा घेतली. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्ससोबत बोलला तर अनेक मित्रांशी मस्करी देखील केली. पण पोलिसांनी मनीषला खरी घडना सांगितली आणि मनीषला धक्काच बसला.
advertisement
व्हॉट्सअॅप सेट केलं अन्...
स्वतःला विराट कोहलीचा चाहता म्हणवणाऱ्या मनीषने जूनच्या अखेरीस देवभोग मोबाईल दुकानातून नवीन सिम खरेदी केलं होतं. एका आठवड्यानंतर, त्याचा मित्र खेमराजने त्याला व्हॉट्सअॅप सेट करण्यास मदत केली, जिथे प्रोफाइल पिक्चरमध्ये आपोआप पाटीदारचा फोटो दिसत होता. त्यावेळी त्यांना असंच आला असेल असं वाटलं. रजत पाटीदारने जेव्हा मध्य प्रदेशच्या सायबर सेलशी संपर्क केला. तेव्हा पोलिसांनी तातडीने अॅक्शन घेतली अन् रजतला सिमकार्ड परत केलं.
एसपी निखिल राखेचा म्हणतात...
कंपनीच्या नियमांनुसार, सहा महिन्यांहून अधिक काळ वापरात नसलेला नंबर इतर ग्राहकांना दिला जातो, ज्यामुळे देवभोग तरुणाला तो नंबर मिळाला असावा. आम्ही आता तो नंबर क्रिकेटपटू रजत पाटीदारला परत केला आहे," असं एसपी निखिल राखेचा म्हणाले.
दरम्यान, 90 दिवसांपेक्षा जास्त काळ निष्क्रिय असलेले नंबर रिसायकल केले जातात. रजत पाटीदार यांचा जुना नंबर निष्क्रिय करून मनीषला देण्यात आला, ज्यामुळे अनवधानाने एका लहान किराणा दुकानाला रजत पाटीदारचा व्हीआयपी नंबर मिळाला.