रूटला ऑफर दिली पण...
लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. यात पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या बॉलर्सचा दबदबा पहायला मिळाला. आता दुसऱ्या दिवशी पहिल्याच बॉलवर एक रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे. इंग्लंडचा जो रूट (Joe Root Century) शतकाच्या उंभरठ्यावर आहे. जो रूट सध्या 99 च्या धावसंख्येवर खेळतोय. यावेळी टीम इंडियाच्या रविंद्र जडेजाने जो रुटला एक ऑफर दिली होती. पण रूटला ती धमकीच वाटली. नेमकं काय झालं?
advertisement
नेमकं काय घडलं?
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या सत्रातील अखेरच्या बॉलवर 98 धावांवर फलंदाजी करणाऱ्या जो रूटला डबल रन पळायचं होतंय पण बॉल जडेजाच्या हातात दिसल्यावर तो थांबला. पण जडेजाने पळ म्हणत ऑफर दिली आणि बॉल खाली ठेवला. पण तरी देखील जो रुटने रिस्क घेतली नाही. त्यानंतर दोन्ही खेळाडूंना हसू आवरलं नाही. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
पाहा Video
पहिल्या दिवसाचा खेळ
दरम्यान, टीम इंडियासाठी पहिला दिवस संघर्षाचा ठरला. स्टार बॉलर आकाश दीप आणि मोहम्मद सिराज यांना विकेट्स मिळाल्या नाहीत. तर ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डी याने एकाच ओव्हरमध्ये दोन धक्के दिले. दिवसअखेर इंग्लंडचा 251 धावांवर 4 गडी बाद असा होता. आता दुसऱ्या दिवशी पीचवर बाऊंस मिळण्याची अपेक्षा आहे.
टीम इंग्लंड - झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर.
टीम इंडिया - यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करूण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, आकाशदिप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर.