आयसीसीच्या पुरुषांच्या कसोटी क्रमवारीच्या ताज्या यादीनुसार भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने मोठा इतिहास रचला आहे. 2024 च्या आयसीसी कसोटी संघात स्थान मिळवणाऱ्या जडेजाने कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वाधिक काळ नंबर वन अष्टपैलू राहण्याचा विक्रम रचला आहे. तो सलग 1151दिवस कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन अष्टपैलू राहिला आहे.
जडेजा 1151 दिवस नंबर वन
गेल्या वर्षी टेस्ट फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या रवींद्र जडेजाने 29.27 च्या सरासरीने 527 धावा केल्या आणि 24.29 च्या सरासरीने 48 विकेट्स घेतल्या. अष्टपैलू म्हणून सर्वाधिक काळ अव्वल स्थानावर राहण्याच्या बाबतीत जडेजाने जॅक कॅसिल, कपिल देव आणि इम्रान खान सारख्या दिग्गजांनाही मागे टाकले. जडेजापूर्वी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डर कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन अष्टपैलू खेळाडू होता,परंतु मार्च 2022 मध्ये जडेजाने त्याला मागे टाकले.
advertisement
आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत,जडेजा ४०० गुणांसह अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या शानदार कामगिरीमुळे, जडेजाने अशी कामगिरी केली आहे जी फार कमी खेळाडू करू शकतात. वयाच्या ३६ व्या वर्षीही, जडेजाची कामगिरी कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण राहिली आहे आणि तो भारतासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली कामगिरी करत आहे आणि तो क्षेत्ररक्षणातही उत्कृष्ट आहे. जडेजाच्या उत्कृष्ट तंदुरुस्तीमुळे तो सातत्याने चांगली कामगिरी करू शकला आहे.
आयसीसी कसोटी ऑलराउंडर रँकिंग - टॉप 10
रवींद्र जडेजा (भारत) - 400 गुण
मेहदी हसन मिराज (बांगलादेश) - 327 गुण
मार्को जानसेन (दक्षिण आफ्रिका) - 294 गुण
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) - 271 गुण
शाकिब अल हसन (बांगलादेश) - 253 गुण
जेसन होल्डर (वेस्ट इंडिज) - 249 गुण
जो रूट (इंग्लंड) - 247 गुण
गस अॅटकिन्सन (इंग्लंड) - 240 गुण
बेन स्टोक्स (इंग्लंड) - 235 गुण
ख्रिस वोक्स (इंग्लंड) - 225 गुण