25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (RCB) संघाने 4 जून 2025 रोजी विजेतेपदाचा आनंद साजरा करताना झालेल्या चेंगराचेंगरीत ज्या 11 लोकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आरसीबीने यासंदर्भात 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक अधिकृत निवेदन जारी केले आहे.
advertisement
आरसीबीचे निवेदन
आरसीबीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, "4 जून 2025 रोजी आमची हृदये तुटली. आम्ही आरसीबी कुटुंबातील 11 सदस्यांना गमावले. ते आमच्या शहराचा, समाजाचा आणि संघाचा एक भाग होते. त्यांची अनुपस्थिती आपल्या प्रत्येकाच्या आठवणीत राहील." आरसीबीने 'आरसीबी केअर्स' (RCB CARES) नावाचे एक नवीन अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे.
सहानुभूती, एकता आणि निरंतर काळजीचे वचन
या दु:खाच्या प्रसंगी आरसीबीने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. हे केवळ आर्थिक सहाय्य नसून, सहानुभूती, एकता आणि निरंतर काळजीचे वचन असल्याचे आरसीबी संघानं म्हटलं आहे. एक पहिले पाऊल म्हणून, आणि त्यांच्याबद्दल असलेल्या आदराने, आरसीबीने त्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मदत दिली आहे, असं आरसीबीने सांगितलं आहे.
आरसीबी केअर्स - नवीन अभियान सुरू
आरसीबीने 'आरसीबी केअर्स' (RCB CARES) नावाचं एक नवीन अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे. हे अभियान मृत कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आले असून, या माध्यमातून दीर्घकाळ अर्थपूर्ण मदत करण्याचे वचन दिलं आहे. संघाच्या मते, हे अभियान चाहत्यांच्या भावना, अपेक्षा आणि गरजा प्रतिबिंबित करेल, असं देखील आरसीबीने म्हटलं आहे.