TRENDING:

FICCI’s India Sports Awards: रिलायन्स फाउंडेशनला 'बेस्ट कॉर्पोरेट' पुरस्कार; अवॉर्ड मिळाल्यावर नीता अंबानींचा संदेश- "स्वप्नांना पंख देण्याची वेळ!"

Last Updated:

FICCI’s India Sports Awards 2025 मध्ये रिलायन्स फाउंडेशनला Best Corporate Promoting Sports – High Performance हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला. अवॉर्ड स्वीकारताना नीता अंबानी यांनी सांगितले की येणारे दशक हे भारतीय क्रीडाजगताचे ‘सुवर्णयुग’ ठरेल. त्यांनी याला केवळ पदकांची शर्यत न मानता, राष्ट्रनिर्मितीचे ध्येय मानले असून भारताला जागतिक मल्टी-स्पोर्टिंग पावरहाऊस बनवण्याचा विश्वास व्यक्त केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली: देशातील खेळांना नवीन उंचीवर नेण्यासाठी कार्यरत असलेल्या रिलायन्स फाउंडेशनला (Reliance Foundation) शुक्रवारी (21 नोव्हेंबर 2025) FICCI च्या इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2025 मध्ये मानाचा पुरस्कार मिळाला आहे. फाउंडेशनला 'सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेट प्रमोटिंग स्पोर्ट्स हाय परफॉर्मन्स' (Best Corporate Promoting Sports – High Performance) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान केवळ संस्थेच्या कार्याची दखल घेत नाही, तर भारतीय खेळाडूंच्या वाढत्या आशा आणि स्वप्नांना नवी दिशा देणारा आहे.

advertisement

हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा नीता एम. अंबानी यांनी जो संदेश दिला, त्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. “स्वप्नांना पंख देण्याची वेळ आली आहे,” या वाक्याने त्यांनी येणारे दशक भारतीय खेळांसाठी सुवर्णकाळ असेल, असे ठामपणे सांगितले. त्यांचा हा संदेश केवळ एक भाषण नसून, खेळांच्या माध्यमातून राष्ट्र-निर्माणाची एक मजबूत घोषणा ठरला.

advertisement

नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स फाउंडेशन सातत्याने भारतातील खेळाडूंना प्रशिक्षण, पायाभूत सुविधा, शिष्यवृत्ती आणि उच्च-कार्यक्षमता (High-Performance) समर्थन देत आहे. त्यांच्या याच निरंतर कार्याची दखल घेऊन FICCI ने त्यांना या सर्वोच्च कॉर्पोरेट खेळ सन्मानाने गौरवण्याचा निर्णय घेतला.

advertisement

आगामी दशक भारतीय खेळांचे सुवर्णयुग असेल. सरकार, कॉर्पोरेट जग, FICCI सारख्या संस्था, आमचे युवा खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबांसोबत एकत्र येऊन आम्हाला भारताला खऱ्या अर्थाने एक जागतिक मल्टी-स्पोर्टिंग पॉवरहाऊस बनवायचे आहे,” असे नीता अंबानी यांनी सांगितले.

advertisement

रिलायन्स फाउंडेशनची ही कामगिरी अनेक वर्षांपासून तळागाळापासून ते उच्च स्तरापर्यंत तयार करण्यात आलेल्या भक्कम सपोर्ट सिस्टीमचे प्रतीक आहे. ही संस्था केवळ क्रिकेट नव्हे, तर ऑलिम्पिक, ॲथलेटिक्स, फुटबॉल आणि इतर अनेक खेळांमध्ये भारताला आपली मजबूत ओळख निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. मिळालेला हा पुरस्कार देशातील तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'परिस्थिती बरी नाही, जाऊ नको' मृत 'श्री'ची परिस्थिती ऐकून डोळ्यात येईल पाणी!
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
FICCI’s India Sports Awards: रिलायन्स फाउंडेशनला 'बेस्ट कॉर्पोरेट' पुरस्कार; अवॉर्ड मिळाल्यावर नीता अंबानींचा संदेश- "स्वप्नांना पंख देण्याची वेळ!"
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल