मॅचेस्टर सामन्याच्या पहिल्या दिवशी क्रिस वोक्सच्या बॉलिंगवर रिव्हर्स स्वीप मारताना रिषभ पंतच्या पायाला बॉल लागला होता.यामुळे रिषभ पंतच्या पायाला सूज आली होती आणि रक्त देखील वाहत होते.या दरम्यान पंतने मैदानात चालण्याचा प्रयत्न केला. पण त्याला चालताना प्रचंड त्रास होत होता.तसेच तो वेदनेने व्हिवळत होता.त्याला आपल्या पायावर उभंही राहता येत नव्हते.त्यामुळे मैदानात अॅम्ब्यूलन्स मागलवून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यानंतर डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्याची मााहिती दिली होती. तसेच त्याला सहा आठवड्यासाठी आराम करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
advertisement
पंतकडे फलंदाजी करण्याशिवाय पर्याय नाही
आयसीसीच्या कसोटी क्रिकेट नियमांनुसार,जर एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर, संघ राखीव खेळाडूला (सब्स्टिट्यूट) क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आणू शकतो. त्यामुळे लॉर्डस टेस्टप्रमाणे ध्रुव जुरेल रिषभ पंतच्या जागी विकेटकिपिंग करू शकतो. पण सब्स्टिट्यूट खेळाडूला फलंदाजी, गोलंदाजी किंवा कर्णधारपदाची जबाबदारी घेता येत नाही, परंतु तो क्षेत्ररक्षण आणि विकेटकीपिंग करू शकतो. त्यामुळे फलंदाजीसाठी रिषभ पंतला मैदानावर उतरावच लागलं. जर टीम इंडिया दुसऱ्या दिवशी चांगल्या स्थितित असती तर रिषभ पंतला फलंदाजी करण्यापासून रोखता आले असते. पण संघाची गरज म्हणून तो फलंदाजीला आला आहे.
दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी फलंदाजी करता येते?
कनकशन नियम: जर खेळाडूला डोक्याला दुखापत (कनकशन) झाली असेल, तर त्याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये सब्स्टिट्यूट खेळाडू पूर्णपणे बदलला जाऊ शकतो, जो फलंदाजी आणि गोलंदाजीही करू शकतो. परंतु पंतच्या बाबतीत दुखापत कनकशनशी संबंधित नव्हती, त्यामुळे जुरेल फक्त क्षेत्ररक्षण आणि विकेटकीपिंग करू शकतो, फलंदाजी नाही.
दरम्यान लंचआधी टीम इंडियाने 6 विकेट गमावून 321 धावा केल्या आहेत. दुखापतग्रस्त रिषभ पंत 39 धावांवर आणि वॉशिग्टन सुंदर 20 धावांवर खेळतो आहे. टीम इंडिया आता पहिल्या डावात किती धावांचा डोंगर उभारते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन :
यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार रिषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज
चौथ्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन :
जॅक क्राऊली, बेन डकेट,ओली पोप,जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार),जेमी स्मिख, क्रिस वोक्स, लियाम डॉसन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर