लखनऊ सूपर जाएंट्स प्रथम फलंदाजी करताना चांगली सूरूवात केली होती. मिचेल मार्श आणि एडेन मार्करम यांनी संघाला वादळी सूरूवात करून दिली होती. 1O ओव्हरपर्यंत दोन्ही खेळाडूंनी 108 धावा कुटल्या होत्या.त्यानंतर मिचेल मार्श 65धावांवर बाद झाला होता.त्यानंतर रिषभ पंत फलंदाजीला उतरला होता. यावेळी तो चांगली खेळी करेल अशी अपेक्षा होती. मात्र तो अवघ्या 7 धावांवर आऊट झाला.यावेळी पंत आऊट होताच संजीव गोयंका निघून गेल्याचे दिसले.
advertisement
ईशान मलिंगाने रिषभ पंतला कॉट अॅड बोल्ड केले.त्यामुळे 27 कोटीच्या या खेळाडूने पुन्हा एका लखनऊची निराशा केली आहे. खरं रिषभ पंतने थेट ईशानच्या हातात बॉल मारला होता.पण हा कॅच खूपच कठिण होता, पण ईशानन तो व्यवस्थित पकडला आणि पंतची विकेट पडली. पंतची विकेच पडताच संजीव गोयंका निघून गेले.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (w/c), आयुष बडोनी, अब्दुल समद, आकाश दीप, आवेश खान, रवी बिश्नोई, दिग्वेश सिंग राठी, विल्यम ओरूरके
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, इशान किशन (w), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, कामिंडू मेंडिस, पॅट कमिन्स (क), हर्षल पटेल, हर्ष दुबे, झीशान अन्सारी, एशान मलिंगा