बीसीसीआयची रात्री उशिरा पोस्ट
भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सीरीजमधील शेवटच्या आणि पाचव्या मॅचआधी भारतीय टीमला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार विकेटकीपर-बॅट्समन ऋषभ पंत दुखापतीमुळे या निर्णायक मॅचमधून (Rishabh pant ruled out of 5th test) बाहेर झाला आहे. त्याच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, बीसीसीआयने मध्यरात्री एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबाबत माहिती दिली. पंतच्या जागी एन. जगदीशनला भारतीय टीममध्ये संधी देण्यात आली आहे.
advertisement
एन. जगदीशनला भारतीय टीममध्ये स्थान
ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे, तमिळनाडूचा विकेटकीपर-बॅट्समन एन. जगदीशनला भारतीय टीममध्ये स्थान मिळाले आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेकदा आपल्या बॅटने प्रभावित केले आहे. विशेषतः लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 277 रन्सची विक्रमी इनिंग्ज खेळली आहे. त्याच्या समावेशामुळे टीमला एक नवीन पर्याय मिळाला आहे. त्यामुळे आता ध्रुव जुरैल याला संधी मिळणार की, एन. जगदीशनला थेट मैदानात उतरवणार, असा सवाल विचारला जातोय.
पाचव्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा स्कॉड -
शुभमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग, एन जगदीशन (विकेटकीपर).