पंतच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर
दुखापत असूनही ऋषभ पंतने दुसऱ्या दिवशी फलंदाजी करत अर्धशतक झळकावून आपली झुंजारवृत्ती दाखवून दिली होती. आता तो पाचव्या दिवशी मैदानात उतरणार आहे. ऋषभ बॅटिंग करणार असल्याने भारताच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. इंग्लंडने दिलेल्या मोठ्या आघाडीसमोर सामना वाचवण्यासाठी पंतची बॅटिंग अत्यंत महत्त्वाची ठरणार होती. बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी चौथ्या दिवस अखेर माहिती दिली.
advertisement
कोच सितांशु कोटक काय म्हणाले?
राहुलची टेकनिक खूप वेगळी असते. त्यामुळेच तो खास प्लेयर आहे. इतर खेळाडूंना राहुलसारखं जमत नाही. त्यामुळेच तो टीम इंडियाचा आधार आहे, असं सितांशु कोटक यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे त्यांनी ऋषभ पंतच्या खेळण्यावर देखील मोठी अपडेट दिली.
ऋषभ पंत पाचव्या दिवशी खेळणार
ऋषभ पंत चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी टीम इंडिया संकटात असताना खेळणार का? असा सवाल विचारला गेला. त्यावर सितांशु कोटक यांनी सकारात्मक उत्तर दिलं. मला वाटतं की ऋषभ पंत पाचव्या दिवशी मैदानात उतरेल, अशी माहिती बॅटिंग कोच सितांशु कोटक यांनी दिली आहे.
दरम्यान, पहिल्याच दिवशी रिव्हर्स स्वीप खेळताना पंतच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाले होते, त्यामुळे तो या सामन्यात विकेटकिपिंग करू शकणार नव्हता. त्याच्याऐवजी ध्रुव जुरेलने विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळली.