मागच्या काही दिवसांमध्ये रोहित शर्माने तब्बल 20 किलो वजन घटवलं आहे. 95 किलो वजन असलेला रोहित शर्मा व्यायाम आणि डाएट करून 75 किलोचा झाला आहे. 20 किलो वजन कमी करताना रोहितने कोणता डाएट प्लान वापरला, तेही आता समोर आलं आहे. या डाएट प्लानमध्ये रोहितचा दिवस सकाळी 7 वाजता सुरू व्हायचा, तर रात्री 9.30 वाजता रोहित दिवसातलं शेवटचं जेवण करायचा.
advertisement
असा आहे रोहितचा डाएट प्लान
सकाळी 7 वाजता- 6 भिजवलेले बदाम, मोड आलेल्या कडधान्यांचं सलाड, फ्रेश ज्युस
सकाळी 9.30 वाजता (ब्रेकफास्ट)- ओटमिल, फळं आणि एक ग्लास दूध
सकाळी 11.30 वाजता- दही, चिला, नारळ पाणी
दुपारी 1.30 वाजता (लंच)- भाज्यांचं सूप, वरण-भात, सलाड
संध्याकाळी 4.30 वाजता- फ्रुट स्मुदी, ड्राय फ्रुट्स
संध्याकाळी 7.30 वाजता (डिनर)- भाज्यांसह पनीर, पुलाव, भाज्यांचं सूप
रात्री 9.30 वाजता- एक ग्लास दूध, मिक्स नट
रोहितचं कमबॅक
ऑक्टोबर महिन्यामध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजआधी 38 वर्षांचा रोहित शर्मा इंडिया ए कडून ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. इंडिया ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात भारतामध्ये 3 वनडे मॅचची सीरिज होणार आहे.