रोहितच्या नेतृत्वाखाली विजय
टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दोन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. पहिले भारताने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला, त्यानंतर 2025 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली. 15 ऑगस्ट रोजी ऋषभ पंतने चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये रोहितसह टीम इंडियाचे सर्व स्टार सेलिब्रेशनमध्ये मग्न असल्याचे दिसून येते. पण जेव्हा ऋषभ पंत त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग घेऊन रोहितकडे पोहोचला तेव्हा त्याने रिटायरमेंटवर भाष्य केलं.
advertisement
पंतच्या व्हिडिओमध्ये काय म्हणाला हिटमॅन?
ऋषभ पंतने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील जेतेपदाच्या विजयाचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये पंत सर्व खेळाडूंना भेटताना दिसला. त्याने रोहितला विचारले. 'भैया, तू स्टंप घेऊन कुठे चालला आहेस..' रोहित शर्मा कॅमेऱ्यासमोर आला आणि म्हणाला, 'मी रिटायरमेंट घ्यावी का, जर मी प्रत्येक वेळी जिंकलो तर मी रिटायरमेंट घेत राहीन का?' रोहितने 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती.
वनडे रिटायरमेंटच्या चर्चा
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर, रोहित शर्माने आयपीएल 2025 च्या मध्यात टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. काही दिवसांनी विराट कोहलीनेही टेस्ट क्रिकेटला अलविदा केला. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर हिटमॅनने पुष्टी केली होती की तो वनडे क्रिकेटमधून दूर जाणार नाही. पण रोहित आणि विराट 2027 च्या वनडे वर्ल्ड कपचा भाग असतील की नाही? याबाबतचा सस्पेन्स अजून कायम आहे.