वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत झाल्यांनंतर रोहित शर्मा भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांची मन हळहळली होती. पराभवानंतर अनेक खेळाडूंनी पुढे येऊन मिळालेल्या सपोर्टसाठी चाहत्यांचे आभार व्यक्त केले, परंतु रोहित शर्मा सोशल मीडियावरून व्यक्त झाला नाही. मध्यंतरी रोहितची मुलगी समायराचा एक व्हिडीओ देखील समोर आला होता. यात ती म्हणाली होती की, "रोहित आता बरा आहे आणि काहीच दिवसात तो पुन्हा हसताना दिसेल".
advertisement
IND vs AUS T20 Series : आवाज कुणाचा टीम इंडियाचा! आता असा रेकॉर्ड करणार की पाकिस्तानचा होणार कचरा!
जवळपास एक आठवड्यानंतर कॅप्टन रोहित शर्माचा एक फोटो समोर आला आहे. रोहित शर्माने स्वतः त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली असून यात तो पत्नी रितिका सोबत दिसत आहेत. तो सध्या पत्नी रितिका आणि मुलीसोबत विदेशात सुट्टीसाठी गेला आहे. रोहितचा हा फोटो पाहून त्याचे फॅन्स काहीसे आनंदी झाले आहेत.
IPL 2024 : मुंबई-गुजरात-मुंबई; हार्दिक पंड्याच्या 'रिटर्न जर्नी' ची ही महत्त्वाची कारणं
आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकले होते. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा परफॉर्मन्स उत्तम होता. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहली याने सर्वाधिक 765 धावा केल्या तर मोहम्मद शमीने सर्वाधिक 24 विकेट घेतल्या. तर रोहित शर्माने देखील यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 597 धावा केल्या. परंतु फायनल सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले.