IND vs AUS T20 Series : आवाज कुणाचा टीम इंडियाचा! आता असा रेकॉर्ड करणार की पाकिस्तानचा होणार कचरा!

Last Updated:

भारत आता आसाम गुवाहाटी येथील स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा सामना खेळणार असून या सामन्यात विजय मिळवल्यास टीम इंडिया सिरीजमध्ये विजयी आघाडी घेईलच पण यासोबत एक वर्ल्ड रेकॉर्ड देखील नावावर करेल.

आवाज कुणाचा टीम इंडियाचा! आता असा रेकॉर्ड करणार की पाकिस्तानचा होणार कचरा!
आवाज कुणाचा टीम इंडियाचा! आता असा रेकॉर्ड करणार की पाकिस्तानचा होणार कचरा!
मुंबई, 27 नोव्हेंबर : वर्ल्ड कपनंतर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरीज सुरु आहे. यातील सुरुवातीच्या दोन सामन्यांत टीम इंडीयाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारून विजय मिळवला असून सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत आता आसाम गुवाहाटी येथील स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा सामना खेळणार असून या सामन्यात विजय मिळवल्यास टीम इंडिया सिरीजमध्ये विजयी आघाडी घेईलच पण यासोबत एक वर्ल्ड रेकॉर्ड देखील नावावर करेल.
भारताने आतापर्यंत 211 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मंगळवारी जेव्हा भारतीय संघ गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा तो त्यांचा 212 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. भारताने आतापर्यंत 211 पैकी 135 टी-20 सामने जिंकले आहेत. पाकिस्ताननेही भारताच्या बरोबरीने 135 सामने जिंकले आहेत. मात्र, पाकिस्तानने तुलनेत भारतापेक्षा 15 जास्त टी 20 सामने खेळले आहेत.
advertisement
जर टीम इंडिया गुवाहाटीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवला जाणारा टी 20 सामना टीम इंडियाने जिंकला तर हा टी 20 क्रिकेटमधील त्यांचा 136 वा विजय असेल. अशा प्रकारे टीम इंडियाला पाकिस्तानला मागे सोडण्याची चांगली संधी आहे. सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याच्या बाबतीत न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी 200 पैकी 102 टी-20 सामने जिंकले आहेत. तर सर्वाधिक विजयांच्या यादीत दक्षिण आफ्रिका 95 सामन्यांसह चौथ्या स्थानावर, ऑस्ट्रेलिया 94 सामन्यांसह पाचव्या तर इंग्लंड 92 सामन्यांसह सहाव्या स्थानावर आहे.
advertisement
जर भारत गुवाहाटीमध्ये नाही जिंकला तरी पुढील दोन सामन्यात विजय प्राप्त करून ते हा रेकॉर्ड नावावर करू शकतात. गुवाहाटीनंतर टीम इंडियाला 1 डिसेंबरला रायपूर आणि 3 डिसेंबरला बेंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-20 सामने खेळायचे आहेत. यातील एक जरी सामना टीम इंडियाने जिंकला तरी भारत पाकिस्तानला मागे सोडेल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS T20 Series : आवाज कुणाचा टीम इंडियाचा! आता असा रेकॉर्ड करणार की पाकिस्तानचा होणार कचरा!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement