भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान कानपूरमध्ये 3 वनडे सामने खेळवले दाणार आहेत. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी हे सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. या वर्षाच्या सुरूवातीला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये रोहित शर्मा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्माची योजना
19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करण्यासाठी हिटमॅन रोहितने तीन अनधिकृत वनडे सामन्यांमध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलिया सीरिजला फिट होण्यासाठी रोहितने एक महिना आधीच सराव सुरू केला होता, पण मॅच प्रॅक्टिससाठी तो ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध खेळू इच्छितो जेणेकरून तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी चांगली तयारी करू शकेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही वनडे सीरिज रोहितची शेवटची सीरिज ठरू शकते, अशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत, पण यावर बीसीसीआय किंवा रोहित शर्माकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पुढचा कर्णधार कोण?
भारतीय क्रिकेट सध्या संक्रमणाच्या टप्प्यातून जात आहे. निवड समिती आणि बीसीसीआय 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माच्या पलीकडे पाहत असल्याची वृत्तही समोर आली आहेत. रोहितला वनडे टीममध्ये स्थान कायम ठेवायचं असेल, तर डिसेंबर 2025 मध्ये सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याला खेळावं लागेल, असंही बोललं जातंय. आशिया कप संपल्यानंतर टीम इंडियाच्या वनडे क्रिकेटच्या भविष्याबाबत चर्चा करण्यासाठी निवड समितीची बैठक होऊ शकते.