काय म्हणाली रितीका?
भटके कुत्रे हे केवळ रस्त्यावर फिरणारे प्राणी नाहीत तर ते शहराचे हृदयाचे ठोके आहेत. ते चहाच्या दुकानांवर बिस्किटांची वाट पाहणारे, दुकानदारांसाठी रात्रीचे पहारेकरी म्हणून काम करणारे, शाळेतून परतणाऱ्या मुलांना पाहून आनंदाने शेपूट हलवणारे आणि त्यांच्या उपस्थितीने वातावरण आत्मीयतेने भरणारे आहेत, असं रितिका म्हणाली.
समस्येचं निराकरण हिंसक नाही - रितीका
advertisement
अचानक आश्रयस्थानात बंद करणे म्हणजे त्यांचे स्वातंत्र्य आणि ओळख हिरावून घेण्यासारखे आहे. या समस्येचे निराकरण हिंसक किंवा कठोर पद्धतींमध्ये नाही तर सामूहिक नसबंदी, लसीकरण, प्रत्येक क्षेत्रात त्यांच्यासाठी नियुक्त केलेले खाद्य क्षेत्र आणि लोकांना त्यांना दत्तक घेण्यास प्रोत्साहित करण्यासारख्या मोहिमांमध्ये आहे, असंही रितीका यावेळी म्हणाली.
हळूहळू आपली माणुसकी गमावतोय - रितिका
जो समाज आपल्या मूक प्राण्यांचे रक्षण करू शकत नाही तो हळूहळू आपली माणुसकी गमावतो. आज कुत्रे आहेत, उद्या कोण असतील? असा सवाल देखील तिने पोस्टमधून उपस्थित केलाय.
भटक्या कुत्र्यांसाठी केंद्राचा प्लॅन
दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या चाव्याच्या वाढत्या घटना आणि जनतेला हानी पोहोचवणाऱ्या भटक्या प्राण्यांबद्दल केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने अशा प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मास्टर अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.