रोहित 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळेल
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना दिनेश लाड म्हणाले, "तिसऱ्या वनडे सामन्यात रोहितने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आणि टीम इंडियाच्या विजयात त्याने ज्याप्रकारे योगदान दिलं त्यामुळे सामना मजेदार झाला. तो 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळेल आणि त्यानंतर निवृत्त होईल." विराटने देखील पर्थ आणि ॲडलेड येथे सलग दोन डक झाल्यानंतर 74 रनची दमदार खेळी केली होती. त्याचं कौतूक देखील लाड यांनी केलं.
advertisement
रोहितचं लक्ष वनडे वर्ल्ड कपकडे
रोहितचं 2027 साली होणारा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचं लक्ष्य असल्याचं दिनेश लाड यांनी कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर सांगितलं होतं. रोहित शर्मा याचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये विजयी होण्याचं लक्ष्य होतं. मात्र दुर्देवाने टीम इंडिया क्वालिफाय करण्यात अपयशी ठरली. आता रोहितचं लक्ष वनडे वर्ल्ड कपकडे आहे, असंही दिनेश लाड म्हणाले आहेत.
सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं...
दरम्यान, विराट असा खेळाडू आहे जो कधीही आणि कुठंही चांगली कामगिरी करू शकतो. "त्याने ज्याप्रकारे आज खेळ केला, ते पाहून आनंद झाला. सचिन तेंडुलकरने खूप वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, रोहित आणि विराट हे असे खेळाडू असतील जे त्याचे रेकॉर्ड तोडतील. दोघंही त्याच्या रेकॉर्डच्या जवळ येत आहेत, हे ऐकून खरोखर खूप चांगलं वाटतं, असंही दिनेश लाड म्हणाले आहेत.
