पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या सीरिजमधून बाहेर
पॅट कमिन्स फक्त भारताविरुद्धच्या सीरिजमधूनच नाही तर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमधूनही बाहेर झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस सीरिजच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अॅशेस मालिकेसाठी फिट होण्यासाठी कमिन्स पुनर्वसन करणार आहे. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार आहे.
advertisement
क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही पॅट कमिन्सबाबत एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की तो भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळणार नाही आणि अॅशेसच्या तयारीसाठी थेट मैदानात उतरेल.
कमिन्सला जुनी दुखापत
पॅट कमिन्सला पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मार्च 2011 मध्ये शेफील्ड शिल्ड स्पर्धेत त्याला पहिल्यांदा ही दुखापत झाली होती. त्यानंतर, नोव्हेंबर 2012, ऑगस्ट 2013 आणि सप्टेंबर 2023 मध्येही पॅट कमिन्सला स्ट्रेस फ्रॅक्चर झालं होतं.
भारत-ऑस्ट्रेलिया सीरिज कधी?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सीरिज 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. दोन्ही टीममध्ये पहिले 3 सामन्यांची वनडे सीरिज होईल, ज्याचे सामने पर्थ, अॅडलेड आणि सिडनी येथे 19, 23 आणि 25 ऑक्टोबर रोजी खेळवले जातील. त्याच वेळी, 5 सामन्यांची टी-20 सीरिज 29 ऑक्टोबरपासून सुरू होईल. टी-20 सीरिजचा पहिला सामना कॅनबेरा येथे खेळला जाईल. दुसरा सामना 31 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे, तिसरी टी-20 2 नोव्हेंबर रोजी होबार्ट येथे, चौथी टी-20 6 नोव्हेंबर रोजी गोल्ड कोस्ट येथे, तर पाचवी टी-20 8 नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेन येथे खेळला जाईल. त्याआधी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 मॅचची सीरिज खेळेल, जी 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.