एमएस धोनी इम्पॅक्ट प्लेयर?
एमएस धोनीचा वापर एक इम्पॅक्ट प्लेयर म्हणून करण्याचा विचार तुम्ही स्वीकारता का, की मैदानावर त्याची उपस्थिती अधिक मौल्यवान आहे? असा सवाल ऋतुराज गायकवाड याला विचारला गेला. त्यावर धोनीला 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून विशेष भूमिका देण्याची गरज नाही. ते मैदानावर असतानाच संघाला खूप फायदा होतो. त्यांची रणनीती आणि अनुभव संघासाठी खूप महत्त्वाचा आहे, असं कॅप्टन ऋतुराज गायकवाड म्हणाला.
advertisement
ऋतुराज गायकवाड म्हणतो...
ऋतुराज गायकवाडने भन्नाट उत्तर दिलं. धोनी आधीपासूनच इम्पॅक्ट प्लेयर आहे. दररोज आपल्याला त्याला पाहायला मिळते, ते खूप प्रेरणा देतं, असं ऋतुराज गायकवाड म्हणाला. म्हणून 43 व्या वर्षी तो जे काही करत आहे ते उल्लेखनीय आहे, असं म्हणत ऋतुराजने धोनीचं कौतूक केलं. निश्चितच, तो शक्य तितके सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास देखील धोनीने यावेळी दाखवला.
चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ - (CSK IPL 2025 Full Squad)
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद.