TRENDING:

Ryan Rickelton च्या कॅचमुळे वाद! स्लो मोशनमध्ये Video पाहून तुम्हीच सांगा, Out की Not Out?

Last Updated:

Ryan Rickelton Catch Video : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील लीड्स येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (England vs South Africa) दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर रायन रिकेलटन चर्चेत आला आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
England vs South Africa : लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर रायन रिकेलटनने एक अविश्वसनीय कॅच पकडला. या कॅचने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. या कॅचमुळे इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रूट केवळ 14 धावांवर बाद झाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव 24.3 ओव्हरमध्ये 131 धावांवर संपुष्टात आला.
Ryan Rickelton Catch Controvery Video
Ryan Rickelton Catch Controvery Video
advertisement

जो रूट क्रीझवर आला अन्...

मंगळवार, सप्टेंबर 2 रोजी झालेल्या या मॅचमध्ये, इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली, परंतु त्यांची सुरुवात खराब झाली. सलामीवीर बेन डकेट फक्त 5 धावांवर बाद झाला. त्यानंतर, जो रूट क्रीझवर आला आणि त्याने आपल्या आकर्षक कव्हर ड्राईव्हने चाहत्यांची मनं जिंकली. रूट मोठी धावसंख्या करेल अशी अपेक्षा होती, पण ते शक्य झालं नाही, ते रायन रिकेलटनमुळे...

advertisement

उडी मारून एका हाताने कॅच पकडला

आठव्या ओव्हरमध्ये, लुंगी एनगिडीने थोडी फुलर लेन्थवर बॉल टाकला. रूटने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल त्याच्या बॅटची कड घेऊन मागे गेला. रायन रिकेलटनने उडी मारून एका हाताने कॅच पकडला. जरी बॉल त्याच्या हातातून निसटला, तरी त्याने चपळाई दाखवत दुसऱ्या प्रयत्नात तो पुन्हा पकडला. रूट 17 बॉलमध्ये 14 धावा काढून बाद झाला आणि इंग्लंडचा संघ दबावात आला. रिकेलटनचा हा कॅच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

advertisement

पाहा Video

इंग्लंडचा घरच्या मैदानावर मात

संपूर्ण इंग्लंडचा संघ फक्त 24.3 ओव्हरमध्ये 131 धावांवर ऑल आऊट झाला. जेमी स्मिथने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली, पण त्याच्याव्यतिरिक्त कोणताही इंग्लिश खेळाडू 15 धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने 5.3 ओव्हरमध्ये 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या, तर वियान मुल्डरने 7 ओव्हरमध्ये 33 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. लुंगी एनगिडी आणि नंद्रे बर्गर यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. 132 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला कोणतीही अडचण आली नाही. त्यांनी 20.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या बदल्यात हा सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ryan Rickelton च्या कॅचमुळे वाद! स्लो मोशनमध्ये Video पाहून तुम्हीच सांगा, Out की Not Out?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल