सचिनने दिली आनंदाची बातमी
काही दिवसांपूर्वी अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक (Saaniya chandhok) यांचा साखरपुडा झाल्याची बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली होती. मात्र, तेंडुलकर किंवा चंडोक कुटुंबातील कोणीही यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर सचिनने स्वतः उत्तर देऊन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
advertisement
आस्क मी एनीथिंग
सोमवारी झालेल्या 'आस्क मी एनीथिंग' सेशनमध्ये एका चाहत्याने सचिनला थेट प्रश्न विचारला, "खरंच अर्जुनचा साखरपुडा झाला आहे का?" यावर सचिनने होकारार्थी उत्तर देत सांगितले की, "हो, त्याचा साखरपुडा झाला आहे आणि त्याच्या आयुष्यातील या नव्या टप्प्यासाठी आम्ही सर्वजण खूप उत्सुक आहोत."
उद्योजक रवी घई यांची नात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा 13 ऑगस्ट रोजी एका खासगी कार्यक्रमात झाला. या कार्यक्रमात केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. सानिया ही प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे. अर्जुन सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) तो मुंबई इंडियन्सचा खेळाडूआहे.