सचिन तेंडुलकर सोमवारी सोशल मीडियावर 'आस्क मी एनीथिंग' च्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत होता, तेव्हा एका चाहत्याने सचिनला अर्जुनचा खरंच साखरपुडा झाला आहे का? असा प्रश्न विचारला. यावर सचिनने, 'हो त्याने साखरपुडा केला आहे आणि आम्ही सर्वजण त्याच्या आयुष्यातील नवीन टप्प्यासाठी खूप उत्सुक आहोत', असं उत्तर दिलं. सचिनच्या या उत्तरामुळे अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे.
advertisement
अत्यंत खासगी समारंभामध्ये कुटुंबातील जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा साखरपुडा पार पडला. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर आले नाहीत, पण दोघांचाही साखरपुडा झाल्याची वृत्त प्रसिद्ध झाली, यावर अखेर सचिन तेंडुलकरने मौन सोडलं आहे.
कोण आहे सानिया चांडोक?
सानिया चांडोक ही मुंबईमधील एका सुप्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातून येते. सानिया ही प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे, ज्यांचं हॉस्पिटॅलिटी आणि फुड इंडस्ट्रीमध्ये योगदान आहे. इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी त्यांच्या मालकीचं आहे.