माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून त्याला "सचिन मिट्स तेंडुलकर" असं कॅप्शन दिल आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत सचिन गाडीतून जात असताना त्याला त्याचा एक चाहता भेटतो. या चाहत्याने तेंडुलकर नावाची जर्सी घातलेली आहे ज्यावर "मिस यू सचिन" असे लिहिले होते. हे पाहून सचिनने त्याच्या फॅनला भेटण्यासाठी गाडी रस्त्याच्या शेजारी थांबवली. सचिनला पाहून त्याच्या चाहता अवाक झाला आणि त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
advertisement
सचिन तेंडुलकरने आपल्या चाहत्याची विचारपूस केली तसेच तो हेल्मेट घालून वाहतुकीचे सर्व नियम पाळत असल्याने त्याचे कौतुक देखील केले. चाहत्याने सचिनला त्याच्याकडे असलेल्या काही आठवणींचा संग्रह दाखवला जो पाहून सचिन भावूक झाला. चाहत्याने सचिनला भेटाच हात जोडले आणि नमस्कार केला.
चाहत्यासोबतचा खास व्हिडीओ शेअर करून सचिन तेंडुलकरने लिहिले, " माझ्यावर प्रेमाचा वर्षाव होताना पाहून माझे हृदय आनंदाने भरून जाते.
अनपेक्षित कोपऱ्यांमधून सतत येणारे लोकांचे प्रेमच माझ्या आयुष्याला विशेष बनवते".
