TRENDING:

Arjun Tendulkar चं ठरलं,प्रसिद्ध उद्योगपतीच्या लेकीसोबत लग्नगाठ बांधणार, कोण आहे तेंडुलकर घराण्याची सून?

Last Updated:

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा लेक अर्जून तेंडुलकर यांचं लग्न ठरल्याची बातमी समोर येत आहेत. कारण नुकताच त्याचा साखरपूडा प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोकशी झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Arjun Tendulkar Engaged saaniya Chandok : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा लेक अर्जून तेंडुलकर याचं लग्न ठरल्याची बातमी समोर येत आहेत. कारण नुकताच अर्जूनचा साखरपूडा प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोकशी झाल्याची सुत्रांकडून माहिती मिळते आहे. अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा एका खाजगी समारंभात पार पडला. या साखरपुड्याला दोन्ही कुटुंबांतील मोजकेच जवळचे सदस्य आणि मित्र परिवार उपस्थित होता. या साखरपूड्याची आता क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान या साखरपूड्याच्या वृत्ताला अद्याप दोन्ही कुटुंबियांकडून दुजोरा मिळाला नाही आहे.
 Arjun Tendulkar Engaged saaniya Chandok
Arjun Tendulkar Engaged saaniya Chandok
advertisement

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, मुंबईतील सर्वात प्रमुख व्यावसायिक कुटुंबांपैकी एक असलेली सानिया चांडोक प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते. सानिया चांडोक ही मुंबईतील मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीमध्ये नियुक्त भागीदार आणि संचालक आहे. घई कुटुंब हॉस्पिटॅलिटी आणि फूड वर्ल्डमध्ये प्रसिद्ध आहे आणि इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि लोकप्रिय आइस्क्रीम ब्रँड ब्रुकलिन क्रीमरीचे मालक आहे.

advertisement

अर्जुनची क्रिकेट कारकिर्द

२५  वर्षीय अर्जुन हा डावखुरा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे जो गोव्याकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळतो आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ मध्ये अर्जुन तेंडुलकरची कामगिरी खूपच मर्यादित होती कारण त्याला संपूर्ण स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबई इंडियन्स (एमआय) ने त्याला मेगा लिलावात ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर कायम ठेवले, परंतु संघ व्यवस्थापनाने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले नाही. यामुळे, त्याच्या नावावर धावा, विकेट किंवा इतर आकडेवारी नोंदवता आली नाही आणि त्याचा संपूर्ण हंगाम बेंचवर घालवण्यात आला.

advertisement

अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत १७ प्रथम श्रेणी, १८ लिस्ट-ए आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये अर्जुनने ३३.५१ च्या सरासरीने ३७ विकेट्स घेतल्या आहेत. तर त्याने २३.१३ च्या सरासरीने ५३२ धावा केल्या आहेत. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये अर्जुनच्या नावावर २५ विकेट्स (सरासरी ३१.२) आणि १०२ धावा (सरासरी १७) आहेत.

टी-२० क्रिकेटमध्ये २५ वर्षीय अर्जुन तेंडुलकरने २५.०७ च्या सरासरीने २७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १३.२२ च्या सरासरीने ११९ धावाही केल्या आहेत. अर्जुन हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याच्या संघाचा भाग आहे. यापूर्वी तो मुंबईकडून खेळायचा. पाहिलं तर, अर्जुनने आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून ५ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर ३ विकेट्स आणि १३ धावा आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar चं ठरलं,प्रसिद्ध उद्योगपतीच्या लेकीसोबत लग्नगाठ बांधणार, कोण आहे तेंडुलकर घराण्याची सून?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल