अंजली तेंडुलकरने विकत घेतलेलं हे घर 391 चौरस फूट आकाराचे आहे. कागदपत्रांनुसार, हा व्यवहार 30 मे 2025 रोजी नोंदणीकृत झाला होता आणि त्यात 1% सवलत आणि 30,000 रुपयांच्या नोंदणी शुल्कानंतर 1.92 लाख रुपयांचं मुद्रांक शुल्क आकारण्यात आले होते. महाराष्ट्रात, महिला घरमालकांना मुद्रांक शुल्कावर 1% सवलत मिळते, राज्यात मुद्रांक शुल्क दर शहर आणि जिल्ह्यानुसार 5% ते 7% दरम्यान असतात.
advertisement
अंजली तेंडुलकर डॉक्टर
अंजली तेंडुलकर व्यवसायाने बालरोगतज्ञ आहे. तिने 24 मे 1995 रोजी सचिनशी लग्न केले. अंजलीने तिचे शालेय शिक्षण बॉम्बे इंटरनॅशनल स्कूलमध्ये पूर्ण केले. तर उच्च शिक्षण मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये घेतलं. सर जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधून अंजली तेंडुलकरने एमबीबीएस पदवी मिळवली.
अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा
सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा सानिया चांडोकशी साखरपुडा झाल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं. सानिया ही रवी घई यांची नात आहे, जे मुंबईमधील एक प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंब आहे. रवी घई हे मुंबईमधील हॉस्पिटॅलिटी आणि फूड क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक आहेत.