TRENDING:

सचिनचं चाललंय काय,'फॅमिलीमॅन' अवतारात 'मास्टरस्ट्रोक', तीन धडाकेबाज निर्णयांच सगळेच करतायत कौतुक

Last Updated:

क्रिकेटचा देव आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या फॅमिलीमॅन बनला आहे.खर तर याआधी देखील तो फॅमिलीमॅन होता. पण क्रिकेटमुळे त्याला कुटुंबियांना फारसा वेळ देता येत नव्हता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sachin Tendulkar News : क्रिकेटचा देव आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या 'फॅमिलीमॅन' बनला आहे.खर तर याआधी देखील तो 'फॅमिलीमॅन' होता. पण क्रिकेटमुळे त्याला कुटुंबियांना फारसा वेळ देता येत नव्हता. पण निवृत्तीनंतर त्याने कुटुंबियांसाठी वेळ काढायला सूरूवात केली आहे. त्यात आता दोनच आठवड्यात त्याने तीन मोठे निर्णय घेतले आहेत. सचिनच्या या निर्णयाचे सध्या सगळेच कौतुक करतायत.
Sachin Tendulkar FAMILY
Sachin Tendulkar FAMILY
advertisement

विरारमध्ये फ्लॅट खरेदी

सचिन तेंडुलकरची पत्नी अर्जुन तेंडुलकरने नुकताच विरारमध्ये एक फ्लॅट खरेदी केला आहे. विरारमधील पेनिन्सुला हाईटस नावाच्या इमारतीत त्यांनी हा फ्लॅट घेतला आहे. या फ्लॅटची किंमत 32 लाख असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे अंजली तेंडुलकरने सरकारने योजनेचा लाभ घेऊन हे घर खरेदी केलं आहे.

अंजली तेंडुलकरने विकत घेतलेलं हे घर 391 चौरस फुट आकाराचे आहे.कागदपत्रानुसार हा व्यवहार 30 मे 2025 रोजी नोंदणीकृत झाला होता. आणि त्यात 1 टक्के सवलत आणि 30,000 रूपयांच्या नोंदणी शुल्कानंतर 1.92 लाख रूपयांचं मुद्राक शुल्क आकारण्यात आले आहे. महाराष्ट्रात महिला घरमालकांना मुद्राक शुल्कावर 1 टक्के सवलत मिळते. राज्यात मुद्रांक शुल्क दर शहर आणि जिल्ह्यानूसार 5 टक्के ते 7 टक्के दरम्यान असतात.

advertisement

साराच्या फिटनेस स्टुडीओच उद्धाटन

अंजली तेंडुलकर आधी सारा तेंडुलकरने अंधेरीमध्ये पिलेटस अकॅडमी म्हणजेच फिटनेस स्टुडीओचं उद्धाटन केलं होतं.या उद्घाटनाचे फोटो देखील तिने शेअर केले होते.या फोटोमध्ये सचिन तेंडुलकर नारळ फोडून या स्टुडीओचं उद्धाटन करताना दिसला होता. तसेच याच फोटोमध्ये सारा तेंडुलकर त्या अकॅडमीची कागदपत्रे आणि चावी घेताना दिसली होती. या उद्घाटन सोहळ्याला विशेष म्हणजे अर्जून तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक देखील उपस्थित होती.

advertisement

दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून सचिन तेंडुलकर त्यांच्याच नावाने सचिन तेंडुलकर फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था चालवत आहेत. या संस्थेच्या माध्यामातून गरीब मुलांना शिक्षण, आरोग्य आणि खेळाशी जोडण्याचे काम केले जाते. या संस्थेमध्ये सचिन तेंडुलकरने मुलगी सारा तेंडुलकरवर याआधी संचालक म्हणून महत्त्वाची जबाबदारी दिली होती.विशेष म्हणजे सारा तेंडुलकरने या फाउंडेशनशी संबंधित कामात पदव्युत्तर पदवी देखील मिळवली आहे.

advertisement

अर्जुन तेंडुलकरचा गुपचूप साखरपूडा उरकला

दरम्यान या दोन्ही उद्घाटन सोहळ्याआधी सचिन तेंडुलकरने त्याला लेक अर्जुन तेंडुलकरचा गुपचूप साखरपूडा उरकला आहे. 13 ऑगस्ट 2025 ला अर्जुन तेंडुलकरचा मुंबईमध्ये प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडोकशी साखरपुडा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या समारंभाला फक्त कुटुंब आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते.पण अर्जुन आणि सानियाच्या साखरपुड्याबाबत तेंडुलकर किंवा घई कुटुंबाकडून अद्याप

कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सचिनचं चाललंय काय,'फॅमिलीमॅन' अवतारात 'मास्टरस्ट्रोक', तीन धडाकेबाज निर्णयांच सगळेच करतायत कौतुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल