गेल्या 13 जुलै 2025ला सायना नेहवालने पती पारूपल्ली कश्यप सोबत घटस्फोट घेत असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते.या घोषणेच्या 19 दिवसानंतर सायना नेहवालने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. सायनाने इन्स्टाग्रामवर कश्यपसोबतचा एक फोटो शेअर केला आहे,या पोस्टमध्ये ती लिहते की, कधी कधी दुरावा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील त्या व्यक्तीची उपस्थिती शिकवून जाते. त्यामुळे आम्ही पुन्हा आमच्या नेत्याला संधी देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे सायना नेहवालच्या या पोस्टवरून तिने घटस्फोटावरून माघार घेतल्याचे स्पष्ट होत आहे.त्याचसोबत पती पी कश्यप यांनी त्यांच्या लग्नाला दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
दरम्यान सायनाने रविवारी 13 जुलैला पती पी. कश्यपपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. यावेळी तिने सोशल मीडियावर लिहले होते की,आयुष्य कधीकधी आपल्याला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर, मी आणि पारुपल्ली यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, वाढ आणि उपचार निवडत आहोत, असे लिहत सायना नेहावालने घटस्फोटाची घोषणा केली होती.
saina nehwal divorce post
तसेच नेहवालने पुढे लिहले, 'त्या आठवणींसाठी मी कृतज्ञ आहे आणि भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. या काळात आमच्या गोपनीयतेला समजून घेतल्याबद्दल आणि त्यांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.'
सायना आणि माजी शटलर कश्यप यांचे डिसेंबर 2018 मध्ये लग्न झाले. दोघांनी जवळजवळ 10 वर्षे एकमेकांना डेट केले. त्यांचे प्रेम सर्वांपासून लपवून ठेवले. त्यानंतर दोघांनी नियोजित तारखेच्या दोन दिवस आधी लग्न केले.