संजय राऊतांनी विचारलेले पाच प्रश्न
1. तुम्ही म्हणता की पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. जर संघर्ष अजूनही चालू असेल तर आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट कसे खेळू शकतो?
2. पहलगाम हल्ला एका पाकिस्तानी दहशतवादी गटाने केला होता, ज्याने २६ महिलांचे सिंदूर पुसले होते. तुम्ही त्या माता आणि बहिणींच्या भावनांचा विचार केला आहे का?
advertisement
3. जर आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळलो नाही तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्यापार थांबवण्याची धमकी दिली आहे का?
4. तुम्ही घोषित केले की "रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही." आता, रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहू शकेल का?
5. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी आणि ऑनलाइन जुगाराचा समावेश आहे, ज्यामध्ये अनेक भाजप सदस्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. गुजरातमधील एक प्रमुख व्यक्ती जय शाह सध्या क्रिकेटचे कामकाज सांभाळत आहेत. यात भाजपला मोठी आर्थिक उलाढाल होते का?
1991 च्या धाडसीपणाचा दाखला
संजय राऊत यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करत पंतप्रधान मोदींना टोला देखील लगावला अन् 1991 मध्ये शिवसेनेने केल्या धाडसीपणाचा दाखला देखील दिला. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हे केवळ आपल्या सैनिकांच्या शौर्याचा अपमान नाही तर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यासह काश्मीरसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या प्रत्येक शहीदांचाही अपमान आहे. हे सामने दुबईमध्ये होत आहेत. जर ते महाराष्ट्रात झाले असते तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांना अडथळा आणला असता, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, हिंदुत्व आणि देशभक्तीपेक्षा पाकिस्तानसोबत क्रिकेटला प्राधान्य देऊन तुम्ही देशाच्या लोकांच्या भावनांना निरर्थक समजत आहात, असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.