सचिनने केलं उद्घाटन
सारा तेंडुलकरच्या पिलाटेस अकॅडमीचं उद्घाटन सचिन तेंडुलकरने नारळ फोडून केलं. हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात गणेश पूजनाने होते, त्याच पद्धतीने सचिनने साराच्या अकॅडमीच्या उद्घाटनावेळी गणेश पूजा केली. या कार्यक्रमाला सारा तेंडुलकरसोबत कुटुंब आणि तिच्या मैत्रिणीही उपस्थित होत्या.
अकॅडमीच्या उद्घाटनाला पोहोचली सून
सचिन तेंडुलकरची होणारी सूनही सारा तेंडुलकरच्या नव्या अकॅडमीच्या उद्घाटनाला आली होती. सारा तेंडुलकरच्या मैत्रिणींसोबत सानिया चंडोकही उपस्थित होती. एक दिवस आधीच सानिया आणि अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 13 ऑगस्टला एका खासगी सोहळ्यात अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
काय आले पिलाटेस अकॅडमी?
पिलाटेस अकॅडमीचं उद्दीष्ट लोकांना फिजिकल हेल्थबद्दल मार्गदर्शन करण्याचं आहे. यामध्ये एक्सरसाईज, शरिराची लवचिकता, आहार आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं जातं. सारा तेंडुलकर तिच्या फिटनेसबद्दल किती सतर्क आहे, हे तिच्या सोशल मीडिया अकाऊंटकडे पाहिलं तरी दिसतं. अनेकवेळा सारा जिममधल्या तिच्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.