27 व्या बर्थडेआधी साराचा व्हिडीओ
तर विषय असा आहे की, सारा तेंडूलकरच्या 27 व्या बर्थडेआधी साराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ती 27 वर्ष पूर्ण होण्याआधी मैत्रिणींना आणि कुटूंबाला सल्ला देण्याची मागणी करतीये. यावेळी साराला अनेकांनी वेगवेगळे सल्ले दिले. वर्षभरापूर्वीचा हा व्हिडीओ असला तरी देखील यामध्ये सानिया आणि अर्जुन दिसत आहेत. यावेळी सानिया नेमकी काय म्हणाली? पाहा
advertisement
सारा टेन्शन घेऊ नको...
सानिया चंडोकला जेव्हा साराने सल्ला मागितला तेव्हा सानियाने सुरेख सल्ला दिला. 'टेन्शन घेऊ नको, स्ट्रेस फ्री राहा... आयुष्याचा आनंद घे', असं सानिया तिला म्हणताना दिसतीये. त्यानंतर साराने अर्जुनला सल्ला मागितला. तेव्हा अर्जुनला हसू आवरलं नाही. आधी 27 ची झाल्याचं वाग, असं म्हणत भावाच्या शैलीत अर्जुनने उत्तर दिलं. त्याचा व्हिडीओ साराने सोशल मीडियावर शेअर केला होता.
पाहा Video
सानिया चंडोक कोण आहे?
सानिया चंडोक मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहेत. त्यांच्या कुटुंबाचा हॉस्पिटॅलिटी आणि फूड उद्योगात मोठा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीमध्ये मुंबईतील इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि 'द ब्रुकलिन क्रीमरी' सारखे प्रसिद्ध ब्रँड्स आहेत. सानियाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली आहे. त्या स्वतः एक यशस्वी उद्योजिका असून, मुंबईमध्ये 'Mr. Paws' नावाचा एक लक्झरी पेट सलून आणि स्पा चालवतात. अर्जुन आणि सानिया एकमेकांना लहानपणापासून ओळखतात आणि त्यांची मैत्री खूप जुनी आहे. त्यांच्या साखरपुड्याचा सोहळा खासगी आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडला, अशी माहिती समोर आली होती.