TRENDING:

Asia Cup 2025 : 3 विकेट काढताच शिवम दुबेचा कॉन्फिडेन्स वाढला, हार्दिक पांड्याबाबत हे काय बोलून गेला? क्रिकेट वर्तुळात चर्चा

Last Updated:

ऑलराऊंडर शिवम दुबेने 3 विकेट घेऊन मोलाची भूमिका बजावली होती.त्यामुळे सामन्यानंतर बोलताना शिवम दुबेने एक ही विकेट न घेणाऱ्या हार्दिक पांड्याबाबत मोठं विधान केलं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IND vs UAE, Asia cup : टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात युएईला 9 विकेटने धुळ चारली आहे. टीम इंडियासमोर 58 धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य टीम इंडियाच्या सलामीविरांनी अवघ्या 4.3 ओव्हरमध्ये गाठत सहज विजय मिळवला आहे. या विजयात ऑलराऊंडर शिवम दुबेने 3 विकेट घेऊन मोलाची भूमिका बजावली होती.त्यामुळे सामन्यानंतर बोलताना शिवम दुबेने एक ही विकेट न घेणाऱ्या हार्दिक पांड्याबाबत मोठं विधान केलं होतं.
shivam dube big statement on hardik pandya
shivam dube big statement on hardik pandya
advertisement

खरं तर टीम इंडियाकडून कुलदीप यादवने 4,शिवम दुबेने 3, जसप्रीत बुमराह,अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्तीने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. टीम इंडियात तीन ऑलराऊंडर खेळाडू होते.एक हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि शिवम दुबे.त्यातल्या त्यात पांड्या आणि दुबे वेगवान गोलंदाजी करतात. पण आजच्या सामन्यात पांड्याला एकही विकेट घेता आली नाही.याऊलट दुबेला तीन विकेट मिळाली होती.त्यामुळे तीन विकेट घेऊन त्याचा कॉन्फिडेन्स भलताच वाढला होता.

advertisement

यावेळी सामना संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिवम दुबे म्हणला, "हार्दिक पंड्या माझ्या भावासारखा आहे - त्याच्याशी माझी तुलना नाही. मी नेहमीच त्याच्या सल्ल्या आणि अंतर्दृष्टीतून शिकत राहतो, असे त्याने म्हटले.त्याच्या या विधानाची आता चर्चा रंगली आहे.

कसा रंगला सामना ?

टीम इंडियाचा कर्णधार सुर्यकुमार यादवने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे.त्यामुळे युएई प्रथम फलंदाजीसाठी उतरली होती.युएईच्या सलामीवीरांनी चांगली सूरूवात केली होती. अलिशान शराफूने 17 बॉलमध्ये 22 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर मुहम्मद वसीमने 19 धावा केल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंचे विकेट पडल्यानंतर इतर 8 खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद झाले होते.अशाप्रकारे युएई 13 ओव्हर 1 बॉलमध्ये 57 धावांवर ऑल आऊट झाली होती.

advertisement

टीम इंडीयाच्या गोलंदाजांनी या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने 4,शिवम दुबेने 3, जसप्रीत बुमराह,अक्षर पटेल आणि वरूण चक्रवर्तीने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.

टीम इंडियासमोर 58 धावांचे लक्ष्य होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 4.3 ओव्हरमध्ये हे आव्हान पुर्ण केले होते. टीम इंडियाकडून अभिषेक शर्माने 30 धावा केल्या होत्या.त्याच्यासोबत शुभमन गिल 20 आणि सुर्यकुमार यादव 7 वर नाबाद राहिला.अशाप्रकारे भारताने 9 विकेट राखून हा सामना जिंकला.

advertisement

भारताची प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती

संयुक्त अरब अमिराती (प्लेइंग इलेव्हन): मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (विकेटकिपर), आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, ध्रुव पराशर, मुहम्मद रोहीद खान, जुनैद सिद्दिकी, सिमरनजीत सिंग

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup 2025 : 3 विकेट काढताच शिवम दुबेचा कॉन्फिडेन्स वाढला, हार्दिक पांड्याबाबत हे काय बोलून गेला? क्रिकेट वर्तुळात चर्चा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल