रोहितने संधी दिली नाही पठ्ठ्यानं मुंबईला बाहेर काढलं
रोहित शर्माने श्रेयस अय्यरला टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळवणं देखील पसंत केलं नव्हतं. तर त्याला टीम इंडियामध्ये गेल्या काही दिवसांपासून संधी देखील मिळाली नाही. तसेच टेस्ट क्रिकेटमध्ये देखील इंग्लंड दौऱ्यात देखील बीसीसीआयने त्याला खेळवणं योग्य समजलं नाही. त्यामुळे आता श्रेयसने आपल्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर दिलंय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही .प्रेशरखाली खेळताना श्रेयसने दाखवलेले धैर्य आणि मोठे फटके मारण्याची क्षमता यामुळेच त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं.
advertisement
श्रेयसच्या लिडरशीपची चर्चा
विशेष म्हणजे, श्रेयस अय्यर आयपीएलच्या इतिहासात तीन वेगवेगळ्या संघांना (दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज) अंतिम फेरीत नेणारा पहिला कर्णधार ठरला आहे. त्यामुळे सध्या क्रिडाविश्वात श्रेयस अय्यर या एकाच नावाची चर्चा आहे. श्रेयसच्या लिडरशीपची चर्चा जास्त होताना दिसत नाही. त्याला क्रेडिट देखील मिळत नाही, असं देखील क्रिडातज्ज्ञांनी म्हटलं आहे.
श्रेयसचा वर्षभराचा प्रवास
दरम्यान, गेल्या वर्षी बीसीसीआयने श्रेयस अय्यरची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून हकालपट्टी केली होती. त्यानंतर श्रेयस आपला दम दाखवला आणि संधी मिळेल तिथं चमकदार कामगिरी करून दाखवली. केकेआरला आयपीएल जिंकवल्यानंतर मुंबईसाठी श्रेयसने विजय मिळवून दिले. देशांतर्गत क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी केली, ज्यात विजय हजारे ट्रॉफी, रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये प्रभावी धावांचा समावेश आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये बीसीसीआयच्या केंद्रीय करारामधून वगळल्यानंतर, आपल्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीमुळे त्याने २०२४-२५ च्या बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत (ग्रेड बी) पुन्हा स्थान मिळवलं.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): प्रियांश आर्य, जोश इंग्लिस (विकेटकिपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमातुल्ला ओमरझाई, काइल जेमिसन, विजयकुमार विषाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रीस टोपली.