श्रेयस अय्यर ICU मध्ये दाखल
टीम इंडियाचा चॅम्पियन बॅट्समन श्रेयस अय्यर याला रिब केजच्या दुखापतीमुळे झालेल्या इंटरनल ब्लीडिंगमुळे सिडनी येथील हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना क्रिकेट जगतासाठी एक गंभीर बाब आहे. अय्यरवर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्याच्या तब्येतीमधील सुधारणेनुसार, त्याला 2 ते 7 दिवसांपर्यंत ऑब्झर्वेशनखाली (Under Observation) ठेवण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement
दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्त्राव
बरगडीच्या दुखापतीमुळे त्याला अंतर्गत रक्तस्त्राव होत आहे. या प्रकारच्या दुखापतीमुळे त्याला उपचारांसाठी जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तो लवकर बरा होऊन कमबॅक करेल अशी आशा त्याचे चाहते करत आहेत. बीसीसीआय देखील त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे.
श्रेयस अय्यरची कामगिरी
दरम्यान, श्रेयस अय्यरची मागील काही मॅचेसमधील परफॉर्मन्स (Performance) खूपच लक्षवेधी राहिली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये त्याने टीम इंडियासाठी मध्यक्रमात (Middle Order) दमदार बॅटिंग करत सर्वाधिक 243 रन्स केले. या टूर्नामेंटमध्ये त्याने न्यूझीलंड विरुद्ध 79 आणि पाकिस्तान विरुद्ध 56 रन्सच्या महत्त्वाच्या खेळी केल्या. याव्यतिरिक्त, IPL 2025 मध्ये त्याने पंजाब किंग्सचे (Punjab Kings) कॅप्टन म्हणून उत्कृष्ट काम केले, 17 मॅचेसमध्ये 50.33 च्या सरासरीने 604 रन्स बनवून टीमला फायनलपर्यंत नेलं होतं. त्यामुळे श्रेयस अय्यर टीम इंडियासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे.
