बरगड्याला बॉल लागला अन्....
ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर बॅटर अॅलेक्स कॅरीच्या हवाई शॉटनंतर तो मागे धावला आणि कॅच घेतल्यानंतर त्याचा तोल गेला. जमिनीवर जोरदार पडल्यानंतर त्याच्या बरगड्याला बॉल लागला. श्रेयस अय्यर पडल्यानंतर फिजिओ मैदानात धावले. दुखापत गंभीर होती आणि त्याला खांद्यावर घेऊन मैदानाबाहेर जावे लागले. श्रेयसला तीव्र वेदना झाल्याचं पहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलंय.
advertisement
पाहा Video
ऑस्ट्रेलियाचा चांगली सुरूवात
आत्तापर्यंत, टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मिचेल मार्श आणि मॅट रेनशॉ यांनी चांगली खेळी केली. मार्शने 50 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्ससह 41 रन केले, त्याला अक्षर पटेलने बोल्ड केले. यानंतर ट्रॅव्हिस हेडने 25 बॉलमध्ये 6 फोरच्या मदतीने 29 रनची वेगवान खेळी केली, पण तो मोहम्मद सिराजच्या बॉलवर प्रसिध कृष्णाकडे कॅच देऊन आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून मॅट रेनशॉने सर्वाधिक 56 रन केले. तो वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलवर एलबीडब्ल्यू झाला. मॅथ्यू शॉर्टने 30 रन आणि अॅलेक्स कॅरीने 24 रन करत योगदान दिलं.
टीम इंडिया (Playing XI): रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया (Playing XI): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), कूपर कॉनॉली, मिचेल ओवेन, नॅथन एलिस, मिचेल स्टार्क, ॲडम झम्पा, जोश हेझलवूड.
