2020 मध्येही श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं आणि आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच दिल्ली फायनलमध्ये पोहोचली. आयपीएल 2025 मध्ये श्रेयस अय्यरने बॅटिंगमध्येही धमाका केला. या मोसमात त्याने 175.07 च्या स्ट्राईक-रेटने 600 पेक्षा जास्त रन केल्या. तरीही अय्यरची आशिया कप 2025 साठी भारतीय टीममध्ये निवड झाली नाही.
'अय्यर त्याच्या टीमला फायनलमध्ये घेऊन गेला, म्हणून तो भारताचा कर्णधार होऊ शकतो, ही चर्चा निरर्थक आहे. सूर्या आयपीएलमध्ये कोणत्याही टीमचं नेतृत्व करत नाही, तरीही तो भारताच्या टी-20 टीमचा कर्णधार आहे. टीम इंडियाचा कर्णधार होण्यासाठी आयपीएल कर्णधार असण्याचा निकष नाही. मागच्या 3 वर्षांपासून रोहित कोणत्याही फ्रँचायझीचा कर्णधार नाही, तरी त्याने भारताला 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकवला. तो अजूनही भारताच्या वनडे टीमचा कर्णधार आहे, म्हणून तुम्ही आयपीएलमध्ये काय करता हा निकष असू शकत नाही', असं संदीप शर्मा म्हणाला आहे.
advertisement
संदीप शर्मा याने जुलै 2015 मध्ये भारतासाठी दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तसंच तो अजूनही आयपीएलमध्ये खेळत आहे. आयपीएल 2025 मध्ये संदीप शर्मा राजस्थान रॉयल्सकडून खेळला. तसंच तो आयपीएलमध्ये आतापर्यंत 3 टीमकडून खेळला आहे.
'आयपीएल पूर्णपणे वेगळी आहे. ती एक देशांतर्गत लीग आहे. त्याप्रमाणे, बीसीसीआयची स्वतःचीही एक देशांतर्गत लीग आहे. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय टीम निवडता तेव्हा तुम्ही 15 जणांची निवड करता. म्हणजे तुम्ही असा कर्णधार निवडता जो 15 जणांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करेल. इथे आयपीएलमध्ये, तुमच्याकडे बरेच देशांतर्गत खेळाडू आहेत, बरेच तरुण खेळाडू आहेत. त्यापैकी काही परदेशातून येतात. पण इथे तुम्ही अशा व्यक्तीची निवड करत आहात जो 15 जणांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करेल', असं वक्तव्य संदीप शर्माने केलं आहे.
'मला वाटते की हा वाद निरर्थक आहे. या दोन्ही टीम पूर्णपणे वेगळ्या आहेत. भारतीय टीम पूर्णपणे वेगळी आहे. आयपीएल टीम पूर्णपणे वेगळी आहे. मला वाटते की लोकांनी शिकण्याची गरज आहे. लोकांनी टिप्पणी करण्यापूर्वी या गोष्टीबद्दल अधिक समजून घेण्याची आवश्यकता आहे', असं संदीप शर्मा म्हणाला.