शुभमन आणि जडेजाचा व्हिडिओ व्हायरल
बर्मिंगहॅम येथे सुरु भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या कसोटी मालिकेचा पहिला सामना इंग्लंडने 5 विकेट्सने जिंकला आणि या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. आता दुसऱ्या सामन्याचा पहिला डाव २ जुलैला खेळला गेला. ज्यात भारताने 310/5 असा स्कोर केला आहे. या दरम्यान, सामन्यात अनेक गोष्टी घडल्या त्यातच एक विडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान, जेव्हा शुभमन आणि जडेजा हे दोन्ही खेळाडू फलंदाजी करत होते, तेव्हा त्यांच्यात काही मनोरंजक गोष्टी घडल्या. ज्याचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्स इंडियाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शुभमन गिलला 'आँखों ही आँखों मे हाहा! मी तुमच्यासोबत आहे' असे म्हणताना ऐकू येते.
advertisement
गिलने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सातवे शतक पूर्ण केले
बर्मिंगहॅममध्ये शानदार फलंदाजी करताना शुभमन गिलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे कसोटी शतक पूर्ण केले आहे. पहिल्या दिवशी खेळ संपेपर्यंत तो 52.77 च्या स्ट्राईक रेटने 216 चेंडूत 114 धावा करून नाबाद आहे. दरम्यान, त्याच्या बॅटमधून 12 चौकार निघाले आहेत. दुसऱ्या दिवशी तो या खेळीला जास्त वेळ देईल अशी चाहत्यांना आशा आहे.
जडेजा त्याच्या 23 व्या अर्धशतकाच्या जवळ आहे
पहिल्या दिवसाअखेर रवींद्र जडेजा 61.99 च्या स्ट्राईक रेटने 67 चेंडूत 41 धावा करून नाबाद आहे. दरम्यान, त्याच्या बॅटवरून पाच चौकार निघाले आहेत. जर तो दुसऱ्या दिवशी आणखी नऊ धावा करू शकला तर तो त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 23 वे अर्धशतक पूर्ण करेल.