निवड समितीने मन बनवले
पीटीआयच्या वृत्तानुसार, टीम मॅनेजमेंट आधीच शुभमन गिलसाठी पर्यायांचा विचार करत होती. पायाच्या दुखापतीमुळे गिल लखनऊमध्ये होणाऱ्या चौथ्या टी-20 सामन्याला मुकण्याची अपेक्षा होती. त्यानंतर, त्याची दुखापत गंभीर नसली तरी त्याला अहमदाबादमधील अंतिम सामन्यात स्थान देण्यात आले नाही. यावरून स्पष्ट होते की निवड समिती आणि टीम मॅनेजमेंट त्याच्या समावेशाचा पुनर्विचार करत आहे. अहवालात म्हटले आहे की, 'बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, टीम मॅनेजमेंटने आधीच उपकर्णधार शुभमन गिलला वगळण्याचा निर्णय घेतला होता. गिल अहमदाबाद सामना खेळू इच्छित होता कारण त्याची दुखापत गंभीर नव्हती'.
advertisement
गिलला खेळायचं होतं
अहवालात असेही म्हटले आहे की मेडिकल टीमला सुरुवातीला हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचा संशय होता, पण नंतर स्कॅनमध्ये फक्त किरकोळ दुखापत दिसून आली. गिल अहमदाबाद सामना पेन किलर घेऊन खेळू शकला असता, पण टीमने त्याला मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला नाही. शुभमन गिल गेल्या काही काळापासून त्याच्या खराब फॉर्ममुळे टीकेचा सामना करत आहे. सप्टेंबरमध्ये आशिया कप दरम्यान टी-20 टीममध्ये परतल्यापासून, त्याने 15 सामन्यांमध्ये फक्त 291 रन केल्या आहेत. त्याची सरासरी 24.25 आहे आणि स्ट्राईक रेट 137.26 आहे. या काळात, त्याने एकही अर्धशतक किंवा शतक केलेले नाही.
दरम्यान एका निवड समितीच्या माजी सदस्याने अजित आगरकरला चूक दुरुस्त करायची होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 'हा एखाद्या खेळाडूला निवडण्याचा किंवा डच्चू देण्याचा मुद्दा नाही तर प्रशिक्षक गौतम गंभीरच्या धोरणात सातत्य नसल्याचं दाखवून देतो. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली म्हणून गिलची टी-20 टीमचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती चुकीची होती, तर आता ही चूक दुरुस्त केली जात आहे. संजू सॅमसनने कोणतीही चूक केली नव्हती', असं वक्तव्य निवड समितीच्या माजी सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर केलं आहे.
टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेट कीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन, हर्षित राणा
