गेल्या साधारण शुक्रवार शनिवार पासून स्मृती मानधनाच्या लग्नाची धुम सांगलीत सूरू होती. या संदर्भातील हळदीचे फोटो देखील समोर आले होते. त्यानंतर आज स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा लग्न सोहळा पार पडणार होता. पण अचानक स्मृची मानधानाचा लग्नसोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरं तर स्मृती मानधनाच्या वडिलांना लग्नाच्या तयारी दरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता, ज्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती.त्यामुळे भरलग्नमंडपात अॅम्ब्युलन्स बोलावून त्यांना सर्वहित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पण वडिलांची तब्येत जिथपर्यंत पुर्णपणे बरी होत नाही तिथपर्यंत लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
advertisement
हार्टअटॅक आल्यानंतर स्मृतीच्या वडिलांची तब्येत कशी आहे? डॉक्टरांनी दिली Health Update
बाबा जोपर्यंत बरे होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही- स्मृती मानधना
आज नाश्ता करतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. पण त्यांना बरं वाटत नसल्याने आम्ही रुग्णवाहिका बोलावली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रीनिवास मानधना हे डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. स्मृती आणि तिच्या वडिलांचे नाते खूपच भावनिक असून ते जोपर्यंत बरे होत नाहीत तोपर्यंत अनिश्चित काळासाठी लग्नसोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय स्वत: स्मृतीने घेतला असल्याचे तिच्या कुटुंबियांनी माध्यमांना सांगितले आहे.
स्मृतीच्या वडिलांची तब्येत कशी आहे?
स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी विचारले असता, डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत. त्यांना सद्य स्थितीत रुग्णालयातच ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच शक्य तितका आराम करण्यासही डॉक्टरांनी बजावल्याने लग्न सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे स्मृतीच्या कुटुंबियांनी सांगितले.
