Smriti Mandhana Marriage : हार्टअटॅक आल्यानंतर स्मृतीच्या वडिलांची तब्येत कशी आहे? डॉक्टरांनी दिली Health Update
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
स्मृतीच्या वडिलांवर उपचार करणाऱ्या डॉ.नमन शहा यांनी त्यांची हेल्थ अपडेट दिली आहे. यावेळी ते स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात.
Smriti Mandhana Father Health Update : टीम इंडियाची स्टार फलंदाज आणि वर्ल्ड कप विजेती खेळाडू स्मृती मानधना आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. स्मृतीच्या वडिलांना लग्नाच्या तयारी दरम्यान हार्टअटॅक आल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान स्मृतीच्या वडिलांना सर्वहित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. त्यात आता स्मृतीच्या वडिलांवर उपचार करणाऱ्या डॉ.नमन शहा यांनी त्यांची हेल्थ अपडेट दिली आहे. यावेळी ते स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात.
आज दुपारी एक दीड वाजता स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्या डाव्या बाजूच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृद्याचा सौम्य धक्का आला आहे.त्यामुळे सध्या आम्ही त्यांच्या सर्व चाचण्या करत आहोत, असे स्मृतीच्या वडिलांवर उपचार करणाऱ्या डॉ.नमन शहा यांनी सांगितले.
VIDEO | Tuhin Mishra, manager of Indian cricketer Smriti Mandhana, confirms that her father is not well and the wedding has been indefinitely postponed.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/K5EVJwyR4h
— Press Trust of India (@PTI_News) November 23, 2025
advertisement
आमच्या कार्डिओलॉजीचे डॉ रोहन थाने यांनी देखील त्यांची प्रकृती पाहून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सध्या त्याचा बीपी वाढल्यामुळे त्यांचे ठोके देखील वाढले आहेत. त्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहण्याची गरज आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण त्यांना बरं व्हायला एक दोन दिवस लागतील,अशी माहिती डॉ.नमन शहा यांनी दिली.
advertisement
रक्तांच्या चाचण्यांमध्ये कार्डिअक एन्जायम वाढल्यामुळे त्यांना ईसीजीवर ठेवण्यात आले आहे आणि गरज पडली तर अॅजिओप्लास्टी करावी लागण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने आम्ही सर्व तयारी केली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.पण आपण एक दिवस रात्रभर त्यांना ठेवून उद्या कुटुंबियांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ,असे डॉ.नमन शहा यांनी सांगितले आहे.
advertisement
बाबा जोपर्यंत बरे होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही- स्मृती मानधना
view commentsआज नाश्ता करतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. पण त्यांना बरं वाटत नसल्याने आम्ही रुग्णवाहिका बोलावली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रीनिवास मानधना हे डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. स्मृती आणि तिच्या वडिलांचे नाते खूपच भावनिक असून ते जोपर्यंत बरे होत नाहीत तोपर्यंत अनिश्चित काळासाठी लग्नसोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय स्वत: स्मृतीने घेतला असल्याचे तिच्या कुटुंबियांनी माध्यमांना सांगितले आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
November 23, 2025 5:12 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana Marriage : हार्टअटॅक आल्यानंतर स्मृतीच्या वडिलांची तब्येत कशी आहे? डॉक्टरांनी दिली Health Update


