आरसीबीसाठी उभं रहावं लागणार
स्मृती मानधना सध्या सांगलीमध्ये तिच्या घरी आहे. एकीकडे वडिलांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे तिच्या होणारा नवरा म्हणजे पलाश देखील रुग्णालयात होता. अशातच आता स्मृतीला दु:ख विसरून आरसीबीसाठी उभं रहावं लागणार आहे. येत्या 24 तासात आरसीबीच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिला आहे.
73 जागा अन् 277 खेळाडू
advertisement
WPL ऑक्शनसाठी फक्त काही तास शिल्लक आहेत. पाच संघांनी त्यांच्या 16 मुख्य खेळाडूंना कायम ठेवले आहे, त्यानंतर सर्व फ्रँचायझी त्यांचे संघ मजबूत करण्याच्या उद्देशाने लिलावात सहभागी होतील. लिलावात एकूण 277 खेळाडूंची निवड केली जाईल, ज्या 73 जागा भरतील. अशातच आता स्मृतीला देखील आरसीबीसाठी खेळाडूंची निवड करावी लागणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे 6.15 कोटी रुपये
दरम्यान, दीप्ती शर्मा (भारत), रेणुका सिंग (भारत), सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), ॲलिसा हीली (ऑस्ट्रेलिया), अमेलिया केर (न्यूझीलंड), मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया) आणि लॉरा या स्टार खेळाडूंना संघात घेण्यासाठी चढाओढ पहायला मिळू शकते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे 6.15 कोटी रुपये शिल्लक आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने स्मृती मानधना, रिचा घोष, एलिस पेरी, श्रेयंका पाटील या खेळाडूंना रिटेन केलं आहे.
