Banana Prices : उन्हाळ्यात टँकरने पाणी घालून केळीची बाग जगवली, आता भाव गडगडले, शेतकऱ्याचे 5 लाख रुपयांचे नुकसान
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शेतकरी शिवतेज गायकवाड यांनी दोन एकरात केळीची बाग केली होती. परंतु अपेक्षित दर मिळत नसल्याने लागवडीचा खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
सोलापूर : केळीच्या दरात प्रचंड प्रमाणात घसरण झाल्याने केळीची बाग केलेले शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकीकडे या वर्षी 43 अंश डिग्री तापमान पार केलेलं असताना सुद्धा टँकरद्वारे केळीच्या बागेत पाणी घालून बाग जगवली. परंतु भाव गडगडल्याने खर्चही निघणे अवघड झाले आहे. मोहोळ तालुक्यातील तरुण शेतकरी शिवतेज गायकवाड यांनी दोन एकरात केळीची बाग केली होती. परंतु अपेक्षित दर मिळत नसल्याने लागवडीचा खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मोहोळ तालुक्यातील शिवतेज गायकवाड यांचे शिक्षण बी. एस. ऍग्री पर्यंत झाले असून डिसेंबर 2024 मध्ये शिवतेजने दोन एकरात केळीची लागवड केली होती. जवळपास 3 हजार केळीची रोपे दोन एकरात लागवड केली होती. उन्हाळ्यामध्ये बागेला पाणी कमी पडत असल्याने शिवतेज यांनी टँकरद्वारे पाणी आणून केळीची बाग जगवली.
advertisement
उन्हाळ्यात केळीच्या बागेला टँकरद्वारे 70 ते 80 हजार रुपयांचे पाणी आणून तळ्यामध्ये साठवून पाण्याचे नियोजन केलं होतं. तसेच केळी लागवडी करत असताना मशागत, केळीची बांधणी, रोग पडू नये म्हणून वेळोवेळी फवारणी सुद्धा केली होती. दोन एकरात केळी लागवडीसाठी चार लाख रुपयांपर्यंतचा खर्च शिवतेज गायकवाड यांना आला होता.
सध्या बाजारात केळीला दोन ते चार रुपये किलो प्रमाणे दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. केळीचे भाव घसरल्याने लागवडीचा खर्च सुद्धा निघणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तरुण शेतकरी शिवतेज गायकवाड यांना या केळीच्या बागेतून एकरी दीड लाख म्हणजेच जवळपास 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Nov 26, 2025 6:16 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Banana Prices : उन्हाळ्यात टँकरने पाणी घालून केळीची बाग जगवली, आता भाव गडगडले, शेतकऱ्याचे 5 लाख रुपयांचे नुकसान






