आरसीबीचा 2008 ते 2025 पर्यंतचा प्रवास
आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली. 18 वर्षांच्या या प्रवासात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू त्यांच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीच्या शोधात होती. अखेर तो दिवस आला आणि मंगळवारी झालेल्या आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात आरसीबीने ट्रॉफीवर त्यांचं नाव कोरल. यापूर्वी आरसीबीने तीन वेळा अंतिम सामन्यात स्थान मिळवले पण नशिबाने त्यांची साथ दिली नाही आणि त्यांना अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. पण 2025 च्या 18 व्या हंगामात जिद्द, सातत्यपुर्ण कामगिरी, ट्रॉफीचं स्वप्नं यामुळे अखेरकार तो दिवस आला आणि आरसीबीच्या नावे पहिली ट्रॉफी आली. या संपूर्ण प्रवासात विराट कोहलीने महत्वाची भूमिका निभावली. विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून 18 व्या हंगामापर्यंत आरसीबीसोबत एकनिष्ठ राहिला त्याची या संघासाठी कामगिरी, त्याने दिलेलं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. काल झालेल्या सामन्यात खेळाडूंसह चाहत्यांचीही इच्छा पूर्ण झाली. याच दरम्यान, आरसीबी जिंकत असताना एका पठ्ठ्याने आगळंवेगळं सेलिब्रेशन केलं.
advertisement
शेवटच्या क्षणी थांबवलं लग्न
आरसीबीसाठी हा हंगाम चढ उतारांनी भरलेला होता. त्याच्या या हंगामाच्या सुरुवातीपासून त्यांनी उत्तम कामगिरी केली आणि अंतिम सामन्यात स्थान मिळवले. या सर्व प्रवासात चाहत्यांच्या अपेक्षा फार वाढल्या होत्या आणि अनेकांनी या वर्षी आरसीबी जिंकावी याकरता अनेक गोष्टी केल्या ज्या सोशल मीडियावर पाहायला मिळत होत्या. अशाच केला चाहत्याने आरसीबी जिंकत असल्याचा क्षण अनुभवण्यासाठी ऐन लग्नात लग्न काही वेळासाठी थांबवले आणि तो क्षण टिपला. आरसीबीची क्रेझ आतापर्यंत सर्वानीच पाहिली आहे. अशा परिस्थिती लग्न थांबवून मॅच बघणं म्हणजे आरसीबीचं जिंकणं किती महत्वाचा क्षण होता याचा अंदाज लावूच शकतो.
आरसीबी विरुद्ध पीबीकेएस सामना कसा झाला?
पंजाब किंग्जने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने पॉवरप्ले मधेच त्यांच्या विकेट गमावल्या. विराट कोहली, पाटीदार, जितेश यांनी डाव सावरला पण 191 धावांचं लक्ष पंजाब समोर त्यांना ठेवता आलं. पंजाब अंतिम सामना जिंकेल अशी अनेकांना अशा होती पण कर्णधाराची विकेट गेल्यानंतर सामन्याचा रूप बदललं आणि आरसीबीने सामना आणि ट्रॉफी त्यांच्या नावे केली. या विजयसह आरसीबीने 18 वर्षांपासूनचं स्वप्न अखेर पूर्ण केलं.