भारताचा घमंड मोडला
साऊथ अफ्रिकेसाठी सायमन हार्मेर आणि मार्को यान्सर दोघं विजयाचे शिल्पकार ठरले. दुसऱ्या कसोटीत भारताला 408 धावांनी पराभव पत्करावा लागला आणि दक्षिण आफ्रिकेने 2-0 अशी ऐतिहासिक मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेने 25 वर्षांपूर्वी मिळवलेल्या कामगिरीचा विक्रम करत भारताचा सर्वात मोठा घमंड मोडला. दक्षिण आफ्रिका हा घरच्या मैदानावर भारताला दोनदा क्लीन स्वीप करणारा पहिला संघ ठरला. यापूर्वी, 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताला कसोटी मालिकेत 2-0 ने हरवले होते.
advertisement
गंभीरच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
टीम इंडियामध्ये नक्कीच चाललंय काय? असा सवाल विचारला जात आहे. टीम इंडियामधील ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. टीम इंडियामध्ये आधीच अनुभवची कमतरता असल्याने गंभीरच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.
टीम इंडिया : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका : एडेन मार्कराम, रायन रिकल्टन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जॉर्गी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन (विकेटकीपर), सायमन हार्मर, केशव महाराज, मार्को जानसेन, सेनुरन मुथुसामी.
