सुरेश रैनाला बेटिंग अॅप १xबेट प्रकरणात चौकशीला बोलावले आहे. ईडी बेटिंग अॅप १xबेट प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवणार आहे. त्यामुळे सुरेश रैना उद्या बुधवारी ईडीने चौकशीसाठी त्यांच्या दिल्ली कार्यालयात बोलावले आहे. या चौकशीत आतात काय बाहेर येते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बेटिंग अॅप १xबेटने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरेश रैना यांना आपला गेमिंग अॅम्बेसेडर बनवले होते. तेव्हा बेटिंग कंपनीने म्हटले होते की,'सुरेश रैनासोबतची आमची भागीदारी क्रीडा सट्टेबाजी चाहत्यांना जबाबदारीने बेटिंग करण्यास प्रोत्साहित करेल. म्हणूनच, त्यांच्या भूमिकेला रिस्पॉन्सिबल गेमिंग अॅम्बेसेडर असे नाव देण्यात आले आहे आणि ते आमच्या ब्रँडचे पहिलेच अॅम्बेसेडर आहेत.
advertisement
'या' क्रिकेटपटूंचीही झालीय चौकशी
ईडीने अलिकडच्या काळात बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म्सविरुद्ध तपास तीव्र केला आहे आणि चित्रपट सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंकडून अशा बेटिंग प्लॅटफॉर्म्सच्या जाहिरातींवर लक्ष केंद्रित केले आहे. 1xBet, FairPlay, Parimatch आणि Lotus365 या बंदी घातलेल्या बेटिंग प्लॅटफॉर्म्सच्या जाहिरातींबाबत सुरू असलेल्या चौकशीचा एक भाग म्हणून, ईडीने यापूर्वी माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि युवराज सिंग तसेच अभिनेता सोनू सूद आणि उर्वशी रौतेला यांची चौकशी केली आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हे बेटिंग प्लॅटफॉर्म त्यांच्या जाहिरातींमध्ये 1xbat आणि 1xbat स्पोर्टिंग लाइन्स सारखे छद्म नाव वापरत आहेत. या जाहिरातींमध्ये अनेकदा QR कोड असतात जे वापरकर्त्यांना बेटिंग साइट्सकडे पुनर्निर्देशित करतात. हे भारतीय कायद्याचे उघड उल्लंघन आहे. अशा बेटिंग प्लॅटफॉर्मसाठी जाहिरात करणाऱ्या काही सेलिब्रिटींना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
तसेच अहवालात म्हटले आहे की हे प्लॅटफॉर्म अनेकदा स्वतःला कौशल्य-आधारित गेमिंग प्लॅटफॉर्म म्हणून प्रमोट करतात, परंतु ते बनावट अल्गोरिदम वापरून बेकायदेशीर बेटिंगसारखे उपक्रम राबवतात.आता या प्रकरणात सुरेश रैना अडकतो की त्याची सूटका होते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.