185 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी
मुंबई इंडियन्स आयपीएलमधून बाहेर पडताच सूर्यकुमार यादवने सुट्टी घेतली नाही. तो लगेच दुसरी मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरला. सध्या मुंबईत सुरू असलेल्या टी-20 मुंबई लीगच्या तिसऱ्या हंगामात सूर्यकुमार यादवने अफलातून कामगिरी करत 185 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली मात्र, त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. या स्पर्धेत सूर्या ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट संघाकडून खेळतोय. आज बुधवारी झालेल्या सामन्यात ईगल ठाणे स्ट्रायकर्स विरुद्ध सूर्याने आयपीएलमधील अपयशाचा राग काढला.
advertisement
टीमच्या नशिबी पराभव
ईगल ठाणे स्ट्रायकर्स विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना सूर्याने वादळी खेळी केली. सूर्याने फक्त 27 चेंडूत 1 सिक्स आणि 8 फोरच्या मदतीने नाबाद 50 धावा केल्या. या खेळीत त्याचा स्ट्राइक रेट 185.19 इतका होता. सूर्याने या मॅचमध्ये गोलंदाजांची बेदम धुलाई केली. सूर्याच्या आक्रमक खेळीमुळे ट्रायम्फ नाईट्सने 20 ओव्हरमध्ये 7 बाद 179 धावा उभ्या केल्या होत्या. मात्र, सूर्याच्या टीमला विजय मिळवता आला नाही.
पहिला नॉन-ओपनर फलंदाज
दरम्यान, यंदाच्या आयपीएल हंगामात सूर्यकुमार यादवने 16 सामन्यांमध्ये 717 धावा कुटल्या. यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश होता. विशेष म्हणजे, त्याने प्रत्येक सामन्यात किमान 25 धावा केल्या, जे त्याचे कमालीचे सातत्य दर्शवते. त्याचा सरासरी 65.18 आणि 167.91 चा स्ट्राइक रेट हे त्याच्या आक्रमक खेळाचं उत्तम उदाहरण आहे. सूर्यकुमार यादव आयपीएलच्या एका हंगामात 700 हून अधिक धावा करणारा पहिला नॉन-ओपनर फलंदाज ठरला आहे. त्याने 2016 मध्ये एबी डिव्हिलियर्सने केलेल्या 687 धावांचा विक्रम मोडीत काढला.